Ravindra Jadeja deleting CSK posts : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मध्यंतरानंतर रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांच्यात काहीतरी बिनसलंय हे नक्की... आयपीएल २०२२ला सुरूवात होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने ( MS DHONI) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. साहजिकच संघातील अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. पण, CSK चा खालावलेला ग्राफ पाहून संघ व्यवस्थापनाने पुन्ही ही जबाबदारी धोनीला घेण्यास सांगितली. त्यावेळी जडेजावर कर्णधारपदाचं नेतृत्व जाणवत असल्याचे धोनीने सांगितले. पण, त्यानंतर जडेजा व CSK यांच्यात दूरावा आल्याची चर्चा सुरू झाली.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने तर त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आयपीएल २०२१ व आयपीएल २०२२ मधील चेन्नई सुपर किंग्स संदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या. त्यामुळे आता जडेजा CSK ला सोडचिठ्ठी देऊन आयपीएल २०२३मध्ये दुसऱ्याच संघाकडून खेळताना दिसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. याआधीही अशी चर्चा रंगली, परंतु CSK अधिकाऱ्यांकडून त्याला फार महत्त्व दिले गेले नाही. मात्र, यावेळी CSK कडून जडेजाच्या सोशल अकाऊंटवरून CSK संदर्भातील पोस्ट डिलीट करण्यावर प्रतिक्रिया आली आहे.
रवींद्र जडेजा २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला. दहा वर्षांच्या प्रवासात जाडेजाने CSKसोबत दोन IPL विजेतेपदे जिंकली. IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी जाडेजाला फ्रँचायझीने १६ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. जडेजाने आयपीएलमध्ये २१० सामन्यांत २५०२ धावा व १३२ विकेट्स घेतल्या आहेत.
जडेजाच्या सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्यावर CSK अधिकारी म्हणाले, ''तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे त्याबाबत आम्हाला फार काही माहीत नाही. पण, “All is Well!” सर्वकाही ठिक आहे. काहीच चुकीचं झालेलं नाही. ''