भारतीय चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाची. पुढील महिन्याच्या 19 तारखेपासून आयपीएलचा थरार रंगणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता वाढत चालली आहे. यंदाचे आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्यानं खेळाडूंची कोरोना चाचणी, जैव सुरक्षितता वातावरण, आदी सर्व विषयांवर चर्चा सुरू आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी पुढील आठवड्यात आणखी कॅरेबियन प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. पण, ही लीग सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूला माघार घ्यावी लागली आहे. विमान पकडण्यासाठी तो वेळेत पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे त्याला आता स्पर्धेत खेळणार नाही.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबीयन अॅलन यानं सीपीएलमधून माघार घेतली आहे. जमैका येथून बार्बाडोस येथे सुटणारं विमान त्याला पकडता आलं नाही. सीपीएलमध्ये तो सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाचा सदस्य आहे. 3 ऑगस्टपूर्वी त्याला बार्बाडोस येथे दाखल व्हायचे होते. तेथून खेळाडूंना चार्टड विमानानं त्रिनिदाद येथे नेण्यात येणार होते, पण तो बार्बाडोस येथेच पोहचू शकला नाही.
''विमानाची माहिती देताना काहीतरी कन्फुजन झालं आणि त्यामुळे त्याला विमान पकडता आलं नाही. आम्ही सर्व प्रयत्न केले, परंतु कोरना व्हायरसमुळे असलेल्या प्रवास निर्बंधामुळे आम्हाला त्रिनिदाद येथे पोहोचता येणार नाही. चार्टड विमान हा एकमेव पर्याय होता,''असे अॅलनच्या एजंटनं सांगितले.
कॅरेबियन प्रीमिअर लीग ( CPL) ला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी खेळाडू, अधिकारी आणि आयोजक आदी त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे दाखल झाले आहेत. सर्व 162 सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता सर्वांना हॉटेलमध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
Shocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का!
Big News : IPL 2020 यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून तत्वतः मान्यता; बीसीसीआयची माहिती
पाकिस्तानी सैन्याला सक्षम बनवा, बजेट वाढवा; अख्तर म्हणतो, गवत खाण्याचीही तयारी!
बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले
Electricity Bill : एकनाथ खडसेंना एक लाख रुपयांचं लाईट बिल; नाथाभाऊंचा पारा चढला!