अष्टपैलू हार्दिक पांड्याने कारकिर्दीला नवी दिशा दिली - राहुल द्रविड

अष्टपैलू हार्दिक पांड्याने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत परिस्थितीनुसार खेळ करताना आपल्या कारकिर्दीला नवी दिशी दिली, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:36 AM2017-09-27T05:36:01+5:302017-09-27T05:36:10+5:30

whatsapp join usJoin us
All-rounder Pankaj gave a new direction to his career - Rahul Dravid | अष्टपैलू हार्दिक पांड्याने कारकिर्दीला नवी दिशा दिली - राहुल द्रविड

अष्टपैलू हार्दिक पांड्याने कारकिर्दीला नवी दिशा दिली - राहुल द्रविड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पांड्याने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत परिस्थितीनुसार खेळ करताना आपल्या कारकिर्दीला नवी दिशी दिली, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.
द्रविड गेल्या वर्षी भारत ‘अ’ संघाच्या आॅस्ट्रेलिया दौºयात पांड्याचा प्रशिक्षक होता. भारत ‘अ’ संघातील खेळाडूही पांड्याच्या फलंदाजीचे अनुकरण करू शकतात, अशी आशा द्रविड यांनी यावेळी व्यक्त केली.
विजयवाडामध्ये न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’ संघाच्या अनौपचारिक कसोटी सामन्यादरम्यान बोलताना द्रविड म्हणाला, ‘हार्दिक कुठल्याही परिस्थितीमध्ये खेळण्यास सज्ज असतो. तो नैसर्गिक खेळ न करता संघाच्या गरजेनुसार खेळतो. त्यामुळे त्याला त्याचे श्रेय द्यायलाच हवे.’
द्रविड म्हणाला, ‘कारकिर्दीची दिशा बदलण्यात यशस्वी ठरलेला तो खेळाडू आहे.’ षटकार ठोकण्याच्या क्षमतेमुळे पांड्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत दोनदा अर्धशतकी खेळी केली आहे. पहिल्या वन-डेमध्ये त्याने धोनीच्या साथीने ८३ धावांची विजयी खेळी केली होती, तर तिसºया वन-डेमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ७८ धावा फटकावल्या.
द्रविड म्हणाला, ‘चौथ्या क्रमांकावर खेळताना तो विशिष्ट प्रकारे फलंदाजी करतो. तो सहाव्या क्रमांकावर खेळताना वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करतो. त्याच्या फलंदाजीमध्ये परिपक्वता दिसते. आपल्याला तेच अपेक्षित आहे.’

Web Title: All-rounder Pankaj gave a new direction to his career - Rahul Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.