मुंबई : डोपिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाण याच्यावर केलेली ५ महिन्यांची निलंबनाची कारवाई लवकरच संपुष्टात येणार असली, तरी अद्याप हे प्रकरण पूर्णपणे संपुष्टात आले नसल्याचे जागतिक उत्तेजकद्रव्य विरोधी संघटनेने (वाडा) स्पष्ट केले आहे. डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर अष्टपैलू युसुफ पठाणवर ५ महिन्यांची बंदी लावण्यात आली होती आणि ही बंदी येत्या १४ जानेवारीला संपणार होती.
पठाणने नकळतपणे ही चूक झाल्याचे कळवले होते व बीसीसीआयने ते मान्य केले होते. मात्र, ‘वाडा’चे माध्यम व संपर्क व्यवस्थापक मॅगी डूरंड यांनी एका ईमेलद्वारे म्हटले की, ‘अद्याप हे प्रकरण संपुष्टात आले नसल्याने आम्ही यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ‘वाडा’च्या डोपिंग आचारसंहिता २०१५नुसार पहिल्यांदा केलेल्या चुकीसाठी खेळाडूवर ४ वर्षांपर्यंत निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद आहे.’ त्याचवेळी ‘बीसीसीआय’ने म्हटले होते की, ‘डोपिंग उल्लंघनप्रकरणी युसुफवर निलंबणाची कारवाई करण्यात आली. त्याने नकळतपणे प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले. हा पदार्थ साधारणपणे सर्दी - खोकल्याच्या औषधामध्ये आढळून येतो.’
Web Title: All-rounder Yusuf Pathan's suspension was not completely removed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.