मुंबई : डोपिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाण याच्यावर केलेली ५ महिन्यांची निलंबनाची कारवाई लवकरच संपुष्टात येणार असली, तरी अद्याप हे प्रकरण पूर्णपणे संपुष्टात आले नसल्याचे जागतिक उत्तेजकद्रव्य विरोधी संघटनेने (वाडा) स्पष्ट केले आहे. डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर अष्टपैलू युसुफ पठाणवर ५ महिन्यांची बंदी लावण्यात आली होती आणि ही बंदी येत्या १४ जानेवारीला संपणार होती.पठाणने नकळतपणे ही चूक झाल्याचे कळवले होते व बीसीसीआयने ते मान्य केले होते. मात्र, ‘वाडा’चे माध्यम व संपर्क व्यवस्थापक मॅगी डूरंड यांनी एका ईमेलद्वारे म्हटले की, ‘अद्याप हे प्रकरण संपुष्टात आले नसल्याने आम्ही यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ‘वाडा’च्या डोपिंग आचारसंहिता २०१५नुसार पहिल्यांदा केलेल्या चुकीसाठी खेळाडूवर ४ वर्षांपर्यंत निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद आहे.’ त्याचवेळी ‘बीसीसीआय’ने म्हटले होते की, ‘डोपिंग उल्लंघनप्रकरणी युसुफवर निलंबणाची कारवाई करण्यात आली. त्याने नकळतपणे प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले. हा पदार्थ साधारणपणे सर्दी - खोकल्याच्या औषधामध्ये आढळून येतो.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणचे निलंबन पूर्णपणे दूर झाले नाही
अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणचे निलंबन पूर्णपणे दूर झाले नाही
डोपिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाण याच्यावर केलेली ५ महिन्यांची निलंबनाची कारवाई लवकरच संपुष्टात येणार असली, तरी अद्याप हे प्रकरण पूर्णपणे संपुष्टात आले नसल्याचे जागतिक उत्तेजकद्रव्य विरोधी संघटनेने (वाडा) स्पष्ट केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:05 AM