Asia Cup साठी ६ संघ झाले जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, वेळ, ठिकाण अन् फॉरमॅट

Asia Cup 2023 - १९८४ पासून आशिया चषक स्पर्धेला सुरूवात झाली. भारताने सर्वाधिक ७ वेळा आशिया चषक उंचावला आहे, त्यापाठोपाठ श्रीलंकेने ( ६) आणि पाकिस्तानने ( २) वेळा बाजी मारली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 05:45 PM2023-08-29T17:45:09+5:302023-08-29T17:46:20+5:30

whatsapp join usJoin us
All you need to know about the Asia Cup 2023, Sri Lanka squad Officially Announced, Fixtures and venues, Groups and tournament format | Asia Cup साठी ६ संघ झाले जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक, वेळ, ठिकाण अन् फॉरमॅट

All you need to know about the Asia Cup 2023

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 - उद्यापासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होतेय. यजमान पाकिस्तान विरुद्ध नेपाळ असा सामना मुल्तान येथे होणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून यंदाची आशिया चषक वन डे फॉरमॅटमध्ये होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे संयुक्तपणे आशिया चषकाचे यजमानपद भूषवित आहेत. त्यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत आणि नेपाळ हे संघ १६व्या आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. नेपाळचा संघ पदार्पण करतोय आणि त्यांनी ACC प्रीमिअर चषक जिंकून ही पात्रता निश्चित केली आहे. फायनलमध्ये त्यांनी UAE ला ७ विकेट्सने पराभूत केले होते. १९८४ पासून आशिया चषक स्पर्धेला सुरूवात झाली. भारताने सर्वाधिक ७ वेळा आशिया चषक उंचावला आहे, त्यापाठोपाठ श्रीलंकेने ( ६) आणि पाकिस्तानने ( २) वेळा बाजी मारली आहे.  

आशिया चषक गट  

  • Group A - भारत, पाकिस्तान, नेपाळ  
  • Group B - अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका 

 

आशिया चषक फॉरमॅट ( Asia Cup Format )
सहा संघांची २ गटात विभागणी केली गेली आहे आणि राऊंड रॉबीनमध्ये सामने होतील. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर फोअरमध्ये पात्र ठरतील. सुपर फोअरपण राऊंट रॉबीनमध्ये होईल आणि दोन संघ फायनलसाठी पात्र ठरतील.  

आशिया चषकातील संघ ( Asia Cup squads)

  • अफगाणिस्तान - हशमतुल्लाह शाहिदी ( कर्णधार), रहमनुल्लाह गुर्बाज, इब्राहिम झाद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजिबुल्लाह झाद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलिखिल, राशीद खान, गुलबदीन नैब, करिम जनत, अब्दुल रहमान, शरफुद्दीन अश्रफ, मुबीज उर रहमान, नूर अहमद, सुलिमान साफी, फजलहक फारुकी 
  • बांगलादेश - शाकिब अल हसन ( कर्णधार), लिटन दास, नजमुल होसैन शांतो, तोवहिद हृदय, मुश्फिकर रहिम, आफिफ होसैन ध्रबो, मेहिदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमुद, मुस्ताफिजूर रहमान, शोरिफूल इस्लाम, नसूम अहमद, शक महेदी हसन, नईम शेख, शमिम होसैन, तंजिद हसन तमिम, तंजिम हसन साकिब
  • भारत- रोहित शर्मा ( कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा  
  • नेपाळ - रोहित पौदेल ( कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख, भीम शारकी, कुशल मल्ला, आरिफ शेख, दिपेंद्र सिंग ऐरी, गुलशान झा, सोमपाल कामी, करन केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंसी, प्रतिक जीसी, मौसोम धकल, संदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद  
  • पाकिस्तान - बाबर आजम ( कर्णधार), अब्दुल्लाह शफिक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हॅरिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हॅरिस रौफ, मोहम्मद वासीम ज्यु., नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तय्यब ताहीर 
  • श्रीलंका - दासुन शनाका ( कर्णधार), पथूम निसंका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महिष थीक्षणा, दुनिथ वेल्लालागे, मथीशा पथिराना, कसन रंजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशान  

आशिया चषकाचे वेळापत्रक - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल

Web Title: All you need to know about the Asia Cup 2023, Sri Lanka squad Officially Announced, Fixtures and venues, Groups and tournament format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.