Indian Cricket Team Meets Australian PM Anthony Albanese: भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अॅडलेडच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्याआधी टीम इंडियातील खेळाडू दोन दिवसीय सराव सामन्यासाठी कॅनबेरा येथे पोहचले आहेत. गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारतीय संघातील खेळाडू यांची ग्रेट भेट झाल्याचा सीन पाहायला मिळाला. कॅनबेरा येथील संसद भवनात झालेल्या या खास भेटीत कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करुन दिली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करून देताना दिसते. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान सर्वात आधी पर्थच्या मैदानात टीम इंडियाचे नेतृत्व केलेल्या जसप्रीत बुमराहशी चर्चा करताना दिसून येते. त्यानंतर ते किंग कोहलीकडे वळतात. विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात खास संवाद रंगल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते. पर्थच्या मैदानात विराट कोहलीनं केलेल्या शतकी खेळीचं ते तोंडभरून कौतुक करतात. यावर विराट कोहली खास अंदाजात रिप्लाय देतानाही पाहायला मिळते.
"पर्थवरची शतकी खेळी खूपच छान. आम्हाला तो क्षण त्रासदायक वाटला नाही," असे म्हणत कोहलीच्या शतकाचा आपल्यालाही आनंद झाला, अशी भावनाच जणून त्यांनी व्यक्त केली. त्यावर रिप्लाय देताना किंग कोहलीनं 'स्पाइसी' शब्दाचा उल्लेख केला. ज्यामुळे छोटा संवाद अधिक मसालेदार झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांची भेट घेतल्याचे व्हिडिओत दिसून येते.
पिंक बॉल टेस्टसाठी भारतीय संघ ३० नोव्हेबरपासून प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघासोबत दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. हा सामना कॅनबेरातील मनुका ओव्हलच्या मैदानात रंगणार आहे.
Web Title: Always got to add some spice What Virat Kohli said to Australian Prime Minister Anthony Albanese Watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.