Alyssa Healy Harmanpreet Kaur, Women's World Cup 2022: न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च येथे झालेल्या महिला विश्व २०२२च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला पराभूत करत सातव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. सलामीवीर अॅलिसा हिलीने संघाला दणकेबाज विजय मिळवून दिला. अॅलिसाने १७० धावांची विक्रमी खेळी करत संघाला ३५६ धावांपर्यंत मजल मारून दिली. इतकी मोठी खेळी करून आणि संघाला वर्ल्ड कप जिंकवून देऊनही एक भारतीय क्रिकेट संघाची (Team India) धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिचा विक्रम तिला मोडता आला नाही.
ख्राईस्टचर्चमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अॅलिसा हिलीने केवळ १३८ चेंडूंमध्ये १७० धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर ती महिला आणि पुरुष विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम फेरीत सर्वात मोठी खेळी खेळणारी फलंदाज ठरली. तिने ऑस्ट्रेलियाचा महान यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टचाही विक्रम मोडला. पण असे असूनही, भारताची अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडण्यात ती केवळ २ धावांनी अपयशी ठरली.
विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीच्या सामन्यांमध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. तिने २०१७च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात १७१ धावांची नाबाद खेळी केली होती. तो विक्रम केवळ दोन धावांनी वाचला. जर हिलीने १७२ धावा केल्या असत्या तर तो विक्रम तिच्या नावावर नोंदवण्यात आला असता.
Web Title: Alyssa Healy Century 170 run knock made Australia won womens world cup but failed to break Indian cricketer Harmanpreet Kaur big record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.