Join us  

Alyssa Healy, Women's World Cup 2022 Final Video: बायकोने केलं 'वर्ल्ड कप फायनल'मध्ये शतक; नवरा Mitchell Starc ने उभं राहूने केला टाळ्यांचा कडकडाट

बायकोचं कौतुक करण्यासाठी मिचेल स्टार्क स्टॅँड्समध्येच बसला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 4:31 PM

Open in App

Alyssa Healy, Women's World Cup 2022: न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च येथे झालेल्या महिला विश्व २०२२ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला पराभूत करत सातव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अ‍ॅलिसा हिलीने हिने फलंदाजी करताना तुफानी शतक झळकावलं. तिचा हा पराक्रम पाहण्यासाठी तिचा नवरा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही उपस्थित होता. तो सामना पाहण्यासाठी स्टँडमध्ये बसला होता. अ‍ॅलिसाने १३८ चेंडूत १७० धावांची दणकेबाज खेळी केली. त्यावेळी तिच्या पतीने उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि तिचं अभिनंदन केलं.

अ‍ॅलिसा हिलीने सलामीला खेळायला येत संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने १३८ चेंडू खेळले. त्यात २६ चौकारांच्या मदतीने तिने १७० धावा कुटल्या. तिने एकही षटकार मारला नाही. पण तरीही ती १२३च्या स्ट्राइक रेटने खेळली. अ‍ॅलिसा हिलीने शतक झळकावताच स्टँड्समध्ये बसलेला मिचेल स्टार्क खूप खूश झाला. आपल्या पत्नीच्या पराक्रमाबद्दल त्याने उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि तिच्या खेळीला सलाम केला. त्याचा हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, अ‍ॅलिसा हिलीच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने महिला विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडसमोर ३५७ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ५ बाद ३५६ धावा केल्या. इंग्लंडचा डाव मात्र २८५ धावांवरच आटोपला.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाइंग्लंडसोशल व्हायरलसोशल मीडिया
Open in App