A Cricketer Become an Officer:केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेला देशातील लोक सामान्य भाषेत IAS परीक्षा देखील म्हणतात. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षेला बसतात, परंतु त्यापैकी काही मोजकेच UPSC परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. या काही मोजक्या लोकांमध्ये भारताच्या माजी क्रिकेटरचे नावदेखील आहे.
आज आम्ही तुम्हाला टीम इंडियाचा माजी खेळाडू अमय खुरासियाबद्दल (amay khurasiya) सांगणार आहोत. 1972 मध्ये मध्य प्रदेशात जन्म झालेल्या अमेय खुरासियाने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि आता ते सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात नियुक्त आहेत. यादरम्यान त्यांनी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली.
अमय खुरासियाची कारकीर्दखुरासियाने वयाच्या 17 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून पदार्पण केले, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळण्यापूर्वी UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाला. अमय खुर्सियाने 1999 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध पेप्सी कपमध्ये पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात खुरासियाने अवघ्या 45 चेंडूत 57 धावा केल्या, पण पहिल्या सामन्यानंतर खुरासिया आपल्या कारकिर्दीत काही खास करू शकला नाही आणि काही वर्षांनी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
अमेय खुर्सियाने भारताकडून केवळ 12 एकदिवसीय सामने खेळले आणि 149 धावा केल्या. खुरासियाने 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता, परंतु खुरासियाने मध्य प्रदेशसाठी 119 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 7000 हून अधिक धावा केल्या. खुर्सिया हा डावखुरा फलंदाज होता. खुर्सियाची सर्वोत्तम धावसंख्या 238 धावा होती. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खुरासियाने 21 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 112 लिस्ट ए सामन्यात 3738 धावा केल्या असून, 38 च्या सरासरीने 4 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत.