Join us  

क्रिकेटमध्ये अंबानींचा बोलबाला; मुंबई इंडियन्सनंतर 'या' दोन देशात खरेदी केल्या क्रिकेट टीम्स

रिलायन्सच्या T-20 स्क्वॉडमध्ये आता आणखी दोन संघ आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 7:49 PM

Open in App

Reliance Cricket Teams : IPLमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावलेल्या Mumbai Indians आता इतर देशातील T-20 लीग्समध्येही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाले आहेत. भारतानंतर रिलायन्सने दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये T-20 लीग संघ विकत घेतले आहेत. रिलायन्सने दक्षिण आफ्रिकेत 'केपटाऊन' संघ विकत घेतला आहे. मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुंबई इंडियन्स ब्रँडने हा संघ खरेदी केला. 

दक्षिण आफ्रिकेतील T-20 लीग संघाचे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये स्वागत करताना संचालिका नीता अंबानी म्हणाल्या, “आमच्या नवीन संघाचे रिलायन्स कुटुंबात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. मुंबई इंडियन्सचा सशक्त आणि मनोरंजक क्रिकेट ब्रँड दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात घेऊन जाण्यास आम्ही उत्सुक आहोत.'' रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेच्या फ्रँचायझीसह आता आमच्याकडे तीन देशांमध्ये तीन T20 संघ झाले आहेत. आम्ही क्रिकेट इकोसिस्टम आणि ब्रँड मुंबई इंडियन्समधील आमच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा फायदा घेण्यासाठी तयार आहोत. चाहत्यांना आम्ही सर्वोत्तम क्रिकेट अनुभव देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.'' 

अनेक खेळांत कंपनीची वाटचालकंपनीच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने क्रिकेट फ्रँचायझी, फुटबॉल लीग, क्रीडा प्रायोजकत्व, मेंटॉरशिप आणि अॅथलीट टॅलेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून देशातील खेळांसाठी एक चांगली इको-सिस्टम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय, RIL च्या CSR विंग- Reliance Foundation Sports च्या माध्यमातून देशभरातील खेळाडूंना चॅम्पियन बनण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात भारताने आपले स्थान मजबूत केल्यामुळे देशात ऑलिम्पिक चळवळ पुढे नेली जात आहे. नीता अंबानी यांच्या प्रयत्नांनी 40 वर्षांनंतर मुंबई 2023 मध्ये प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सत्र आयोजित करेल.

टॅग्स :मुंबई इंडियन्समुकेश अंबानीनीता अंबानीऑफ द फिल्ड
Open in App