Join us  

चौथ्या क्रमांकाची चिंता मिटली, विश्वचषक स्पर्धेत 'हा' खेळाडू फिक्स; कोहलीचे संकेत

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:06 AM

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. भारताने हा सामना 224 धावांनी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यातील रायुडूच्या शतकी खेळावर कर्णधार विराट कोहली भलताच खुश झालेला पाहायला मिळाला. त्याने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाची चिंता मिटल्याचे सांगताला रायुडूचे संघातील स्थान पक्के असल्याचे संकेत दिले आहेत.

रायुडू आणि सलामीवीर रोहित यांनी तिसऱ्या विकेटसाठी 211 धावांची भागीदारी केली. विंडीजविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. कोहली म्हणाला,'' रायुडूने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. 2019च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्याला संधी द्यायला हवी. सामन्यातील परिस्थितीनुसार तो खेळ करतो.'' कोहलीने युवा गोलंदाज खलील अहमदचेही कौतुक केले. 

मुंबईत झालेल्या या सामन्यात रोहितने 162 धावांची खेळी केली. तो म्हणाला,''रायुडूच्या आजच्या खेळीनंतर आशा करतो की विश्वचषक स्पर्धेपर्यंत चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत कोणी चर्चा करणार नाही. रायुडूने सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. तणावजन्य परिस्थितीतही तो चांगली कामगिरी करतो. त्याला आम्ही बऱ्याच वर्षांपासून ओळखतो आणि तो चांगली खेळी खेळू शकतो.'' 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज