Join us  

Ambati Rayudu Power Hitting Video, IPL 2022 PBKS vs CSK: 6, 6, 6, 4 .... अंबाती रायुडूचा झंझावात! पंजाबच्या गोलंदाजाला फोडून काढला!!

अंबाती रायुडूने ३९ चेंडूत कुटल्या ७८ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:21 AM

Open in App

Ambati Rayudu Power Hitting Video, IPL 2022 PBKS vs CSK: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने (Punjab Kings) रवींद्र जाडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जवर (Chennai Super Kings) ११ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर संघाने CSK ला १८८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे प्रयत्न तोकडे पडले. पण अंबाती रायुडूने संघाला जिंकवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. त्याने संदीप शर्माला तुफान चोप दिला.

CSKच्या डावाच्या सोळाव्या षटकांत संघाला विजयासाठी २८ चेंडूत ६९ धावांची गरज होती. त्यावेळी संदीप शर्माच्या गोलंदाजीचा अंबाती रायुडूने चांगलाच समाचार घेतला. पहिला चेंडू त्याने लाँग ऑफच्या दिशेने सिक्स मारला. दुसऱ्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशने फ्लिक करून षटकार खेचला. त्यानंतर पुढचा चेंडू बाऊन्सर आल्यानंतर त्याने थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. तसेच, शेवटच्या चेंडूवर त्याने चौकार खेचत संदीप शर्माची पाठवणी केली. पाहा व्हिडीओ-

परंतु, त्यानंतर धावांचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात रायुडू झेलबाद झाला. रायुडू शिवाय चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने २७ चेंडूत ३० धावा केल्या. परंतु इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तत्पूर्वी, पंजाबच्या डावात शिखर धवनने दमदार अर्धशतक ठोकले. पहिल्या चेंडूपासून खेळायला आलेल्या शिखरने शेवटच्या चेंडपर्यंत मैदान राखले आणि नाबाद ८८ धावा केल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२अंबाती रायुडूचेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्सशिखर धवन
Open in App