अंबाती रायुडूनं केला भ्रष्टाचाराचा आरोप, घेतला संघाकडून न खेळण्याचा निर्णय

वर्ल्ड कप स्पर्धेत शिखर धवन व विजय शंकर दुखापतीमुळे माघारी फिरूनही अंबाती रायुडूच्या नावावर काट मारली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 04:40 PM2019-11-23T16:40:18+5:302019-11-23T16:40:51+5:30

whatsapp join usJoin us
Ambati Rayudu pulls out of Ranji Trophy, accuses HCA of indulging in corrupt practices | अंबाती रायुडूनं केला भ्रष्टाचाराचा आरोप, घेतला संघाकडून न खेळण्याचा निर्णय

अंबाती रायुडूनं केला भ्रष्टाचाराचा आरोप, घेतला संघाकडून न खेळण्याचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वर्ल्ड कप स्पर्धेत शिखर धवन व विजय शंकर दुखापतीमुळे माघारी फिरूनही अंबाती रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अग्रवाल यांना लंडनला पाठवले होते. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्यानं शंकरच्या निवडीनंतर सोशल मीडियावर नाराजी व्यक्तही केली होती आणि त्यानंतर त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला होता. अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. त्यामुळे नाराज होत त्यानं निवृत्ती जाहीर केली. पण, त्यानं हा निर्णय मागे घेत हैदराबाद क्रिकेट असोशिएशनकडे पुन्हा खेळण्याची विनंती केली होती. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्वही केले. 

पण, शनिवारी रायुडूनं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला कंटाळून संघातून माघार घेतली आहे. त्यामुळे आगामी रणजी करंडक स्पर्धेत हैदराबाद संघाकडून न खेळण्याचा निर्णय रायुडूनं घेतला आहे. शिवाय त्यानं या भ्रष्टाचार प्रकरणात तेलंगणाचे मंत्री के टी रामा राव यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यानं ट्विट केलं की,''हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर लक्ष द्यावे, हैदराबाद सारख्या क्रिकेटप्रेमी संघटनेवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत.''


मर्यादित षटकांच्या सामन्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी नोव्हेंबर 2018मध्ये रायुडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम केला होता. त्यानंतर रायुडूनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 217 धावा केल्या. त्यात मुंबईतील मॅच विनिंग शतकी खेळीही होती. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतही त्यानं ( 190) सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर वर्ल्ड कप पूर्वीच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याला अपयश आले आणि तो वर्ल्ड कप संघातूनच बाहेर पडला. 

रायुडूनं भारताकडून 6 ट्वेंटी-20 सामन्यांत 42 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 97 सामन्यांत 45.56 च्या सरासरीनं 6151 धावा कुटल्या आहेत आणि त्यात 16 शतकं व 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 160 सामन्यांत 5103 धावा केल्या, तर सर्व प्रकारच्या 216 ट्वेंटी-20 लढतीत 4584 धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे. त्याची ही विनंती मान्य झाली.  33 वर्षीय रायुडूनं  55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 
 

Web Title: Ambati Rayudu pulls out of Ranji Trophy, accuses HCA of indulging in corrupt practices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.