Amit Mishra: एकाला मदत केली अन् अमित मिश्राच्या मागे नसती 'कटकट'! फॅन्स मागतायेत पैसे

अमित मिश्राने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो नेहमी काही ना काही कारणावरून चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 03:22 PM2022-09-30T15:22:03+5:302022-09-30T15:22:51+5:30

whatsapp join usJoin us
Amit Mishra's fans are demanding money from him, bizarre tweet goes viral | Amit Mishra: एकाला मदत केली अन् अमित मिश्राच्या मागे नसती 'कटकट'! फॅन्स मागतायेत पैसे

Amit Mishra: एकाला मदत केली अन् अमित मिश्राच्या मागे नसती 'कटकट'! फॅन्स मागतायेत पैसे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी खेळाडू अमित मिश्राने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो नेहमी काही ना काही कारणावरून चर्चेत असतो. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसेच क्रिकेट वर्तुळात घडणाऱ्या घडामोंडीवर तो भाष्य देखील करत असतो. आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावरून देखील त्याने मोहम्मद रिझवान करत असलेल्या सततच्या अपीलवरून त्याने त्याची खिल्ली उडवली होती. नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असलेल्या मिश्राला चाहते वेगवेगळे ट्विट करून त्याला प्रश्न विचारत असतात. अशातच एका चाहत्याने मिश्रा याच्याकडे अशी मागणी केली, ते पाहून सोशल मीडियावरील सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. 

दरम्यान, सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा थरार रंगला आहे. पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सुरेश रैनाने शानदार झेल पकडला. रैनाचा हा अप्रतिम झेल पाहून मिश्रा देखील आश्चर्यचकित झाला आणि त्याने रैनाच्या झेलचा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक करणारे ट्विट केले. यानंतर मिश्राच्या याच ट्विटवर एका चाहत्याने त्याला उघडपणे गुगल पेवर 300 रूपये पाठविण्यास सांगितले. या चाहत्याने लिहिले की, "सर 300 रूपये गुगल पे करा 2 मैत्रीणींना फिरायला घेऊन जायचे आहे." अमित मिश्राने त्याच्या एका चाहत्याची इच्छा पूर्ण केली मात्र यामुळे मिश्राचीच डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

खरं तर अमित मिश्राने ट्विटरवर सुरेश रैनाच्या शानदार कॅचचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्याला कमेंट करताना एका चाहत्याने मिश्राकडे 300 रूपयांची मागणी केली होती. चाहत्याच्या मागणीला अमित मिश्राने प्रतिसाद देत 500 रूपये ट्रान्सफर केले, ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. मात्र आता अमित मिश्राने पाठवलेल्या स्क्रीनशॉटवरून सर्वच चाहते त्याच्याकडे पैशांची मागणी करत आहेत. 

रैनाने जुन्या आठवणींना दिला उजाळा 
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 बद्दल भाष्य करायचे झाले तर, या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात इंडिया लीजेंड्च्या सुरेश रैनाने अप्रतिम झेल घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचा झेल घेतला. रैनाच्या या झेलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

Web Title: Amit Mishra's fans are demanding money from him, bizarre tweet goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.