मुंबई : आतापर्यंत बरेच राजकारणी बीसीसीआय आणि अन्य खेळांच्या संघटनांमध्ये आले. पण या राजकारण्यांना खेळाबद्दल चांगलीच माहिती असल्याचे पाहायला मिळाले. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपूत्र जय यांनी बीसीसीआयमध्ये प्रवेश केला आहे. बीसीसीआयच्या सचिवपदी जय हे विराजमान झालेले आहेत. पण जय यांचे क्रिकेटबाबतचे अज्ञान सर्वांपुढे आल्याचे म्हटले जात आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या सामन्यानंतर जय यांनी एक ट्विट केले. यानंतर जय यांची अडचण झाल्याचे म्हटले गेले. कारण जय यांनी क्रिकेटच्या एका विक्रमाबद्दल आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. पण त्यांची ही माहिती चुकीची असल्याचे पुढे आले आहे.
तिसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने हॅट्ट्रिकसह सहा बळी मिळवले. यानंतर जय यांनी दीपक हा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक मिळवणारा भारताचा पहिला गोलंदाज आहे, असे आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. पण ही गोष्ट चुकीची आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून पहिली हॅट्ट्रिक एकता बिश्तने नोंदवली आहे.
एका रात्रीत बदलले दीपक चहरचे आयुष्य; नेमकं घडलं तरी काय...
मुंबई : फक्त एक क्षण तुमचे आयुष्य बदलण्यासाठी पुरेसे ठरू शकते. पण आता तर एका रात्रीत भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरचे आयुष्य बदलल्याचे म्हटले जात आहे. पण एका रात्रीत नेमकं असं घडलं तरी काय, याचा विचार आता तुम्ही करत असाल...
बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत वेगवान दीपक चहारने आपली छाप पाडली. नेत्रदीपक गोलंदाजी करत चहरने सर्वांची मने जिंकली. धावांचा पाठलाग करताना दीपक चहरने तिसऱ्या षटकात बांगलादेशला दोन धक्के दिले. त्यानं लिटन दासला पहिले बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनं सुरेख झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर त्यानं सौम्या सरकारला माघारी पाठवलं. त्यामुळे आता त्याचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांचे संघातील स्थान पक्के झाल्याचे समजते. पण काही खेळाडूंचे स्थान मात्र आता धोक्यात आले असल्याचेही म्हटले जात आहे.
दीपकला सुरुवातीला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघात पाहिले गेले. चेन्नईमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरच त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. पण भारतीय संघात सातत्यपूर्ण कामगिरी करत असतानाही त्याचे संघातील स्थान निश्चित समजले जात नव्हते. पण मग एका रात्रीत असे नेमके घडले तरी काय...
बांगलादेशविरुद्धचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना दीपकसाठी फार मोलाचा ठरला. या सामन्यात दीपकने हॅट्ट्रिकसह सहा बळी मिळवले आणि क्रिकेट विश्वाने त्याची दखल घेतली. या पराक्रमानंतर बीसीसीआयनेही त्याचे कौतुक केले. या एका रात्रीत दीपक स्टार झाल्याचे म्हटले जात आहे. पण दीपकचे भारतीय संघातील स्थान निश्चित राहील का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
Web Title: Amit Shah's son came to BCCI; But in the case of cricket, he seemed wrongly said record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.