Umpiring: अंपायरिंग करणं सोपं नाही! १४० पैकी फक्त ३ झाले पास; प्रश्न ऐकताच व्हाल हैराण

क्रिकेटच्या मैदानात अपयश आल्यानंतर क्रिकेटशी निगडीत आणखी काय करता येईल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:56 PM2022-08-18T13:56:17+5:302022-08-18T13:57:44+5:30

whatsapp join usJoin us
An examination for umpiring was held at Ahmedabad in which only 3 out of 140 passed  | Umpiring: अंपायरिंग करणं सोपं नाही! १४० पैकी फक्त ३ झाले पास; प्रश्न ऐकताच व्हाल हैराण

Umpiring: अंपायरिंग करणं सोपं नाही! १४० पैकी फक्त ३ झाले पास; प्रश्न ऐकताच व्हाल हैराण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतात क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी कमी नाही. जगामध्ये क्रिकेटचे सर्वाधिक चाहते भारतात आहेत. क्रिकेटच्या मैदानावर खेळून आपले कौशल्य सर्वांसमोर सादर करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. क्रिकेटच्या मैदानात अपयश आल्यानंतर क्रिकेटशी निगडीत आणखी काय करता येईल असा प्रश्न मनात येतो. अशा स्थितीत अनेक खेळाडूंचे मन अंपायरिंगकडे जाते. मात्र अंपायरिंग करणे सोपं काम नाही त्यासाठी अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अलीकडेच अहमदाबादमध्ये पंचांसाठी लेव्हल टू परीक्षा घेण्यात आली होती, ज्यामध्ये १४० सदस्यांपैकी फक्त तीन सदस्य ही परीक्षा पास करू शकले आहेत.

अंपायरिंगसाठी परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये क्रिकेटशी संबंधित ३७ प्रश्न विचारण्यात आले. या दरम्यान सर्व उमेदवारांना लेखी, व्हिडीओ आणि शारीरिक चाचणी यातून जावे लागले. जगभरात पसरलेल्या कोरोना महासाथीमुळे, वाढत्या शारीरिक मागण्या लक्षात घेऊन बोर्डाने प्रथमच अंपायरिंगमध्ये शारीरिक चाचण्यांचा समावेश केला होता. व्हिडीओ चाचणीमध्ये सामन्याचे फुटेज आणि विशिष्ट परिस्थितीत अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 

परीक्षेत विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे - 

  1. स्टेडियमची, झाडाची किंवा फिल्डरची सावली खेळपट्टीवर पडू लागली आणि फलंदाजाने तक्रार केली तर तुम्ही काय कराल?
  2. जर एखाद्या गोलंदाजाच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली असेल आणि त्याने पट्टी काढली तर रक्त असेल. अशावेळी तुम्ही त्याला पट्टी काढून गोलंदाजी करायला सांगाल का?
  3. फलंदाजाने शॉट मारल्यानंतर शॉर्ट लेगकडील फिल्डरचे हेल्मेट खाली पडते आणि त्यामध्ये चेंडू जाऊन अडकून राहतो आणि मैदानावर पडण्यापूर्वी फिल्डर त्याची झेल घेतो. अशा स्थितीत खेळाडूंच्या अपीलवर तुमचा काय निर्णय असेल? 

 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितले, "जगातील सर्वोत्तम पंचांची निवड करता यावी म्हणून ही परीक्षा अधिक कडक करण्यात आली. अंपायरिंग करणे हे कठीण काम आहे. ज्यांना त्याची आवड आहे तेच खऱ्या अर्थाने उत्कृष्ट कामगिरी करू शकतात", असे अधिकाऱ्याने अधिक म्हटले. 

त्या ३ प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे -

  1. स्टेडिअमच्या किंवा झाडांच्या सावलीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. यादरम्यान फिल्डरला स्थिर राहण्यास सांगायला हवे. असे न झाल्यास अंपायरणे डेड बॉल घोषित करणे गरजेचे आहे.
  2. गोलंदाजाला गोलंदाजी करायची असल्यास त्याला पट्टी हटवणे बंधनकारक असेल.
  3. योग्य निर्णय 'नॉट आऊट' असेल.

 

Web Title: An examination for umpiring was held at Ahmedabad in which only 3 out of 140 passed 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.