आंतरराष्ट्रीय संघांनी टी-20 सामने खेळू नये असं इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी म्हटलं आहे. रविवारी न्यूझिलंडविरोधात तिरंगी मालिकेत विजय मिळवल्यानंतरही कमी धावगतीमुळे इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही. त्यानंतर प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांनी स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत टी-20 बंद करण्याबाबत विधान केलं. यामुळे खेळाडूंवर आणि प्रशिक्षकांवरील दबाव कमी होईल असं ते म्हणाले.मी आंतरराष्ट्रीय टी-20 खेळलो नसतो. जर तुम्हाला दर चार वर्षांनी विश्वचषक खेळायचा असेल, तर 6 महिने आधीच टी-20 सामने संपवायला हवेत. जर सातत्याने एवढे सामने खेळलो तर एक वेळ येईल जेव्हा खेळाडू आणि प्रशिक्षकही यामुळे बोर होतील. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक हवेत असा सल्ला देखील बेलिस यांनी दिला. स्विमिंगचं उदाहरण देताना त्यांनी 1500 मीटर आणि 100 मीटरसाठी वेगवेगळे खेळाडू असतात असं म्हटलं. दुसरीकडे, न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या आयोजनाच्या निर्णयाची पाठराखण करताना क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हेसन यांनी टी-20 क्रिकेटचे आयोजन निरुपयोगी असल्याच्या मताचेही खंडन केले. याविषयी हेसन यांनी सांगितले की, ‘क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू आहेत जे केवळ टी-20 क्रिकेट सामने खेळतात. परंतु या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचीही संधी मिळते. त्यामुळे माझ्या मते टी20क्रिकेटचे आयोजन पूर्णपणे योग्य असून यामुळे खेळाडूंचे नुकसान होत नाही.’ खेळाडू व सपोर्ट स्टाफवर प्रदीर्घ कालावधीच्या दौ-याचा होणा-या प्रभावाचा विचार करताना बेलिस यांची चिंता योग्य असल्याचे हेसन म्हणाले. पण, क्रिकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी टी-20 ची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'टी-20 सामने बंद करा', पराभवानंतर इंग्लंडचे कोच संतापले
'टी-20 सामने बंद करा', पराभवानंतर इंग्लंडचे कोच संतापले
रविवारी न्यूझिलंडविरोधात तिरंगी मालिकेत विजय मिळवल्यानंतरही कमी धावगतीमुळे इंग्लंड संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:56 AM