Join us  

धोनीचं कौतुक करत Anand ‘Mahi’ndra यांनी केलं ट्वीट, म्हणाले, “आनंद आहे की आमच्याकडे…”

Anand Mahindra Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे गुरुवारी मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात दाखवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 5:28 PM

Open in App

Anand Mahindra Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अजूनही तो मॅच फिनिशर आहे हे गुरुवारी मुंबई इंडियन्सविरोधात झालेल्या सामन्यात दाखवून दिले. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना CSKची विकेट पडली. त्यानंतर चार चेंडूंत १६ धावा करायच्या असूनही धोनी शांत उभा राहिला आणि त्यानंतर जे वादळ घोंगावलं त्याने मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) विजयाच्या स्वप्नांचा पालापाचोळा केला.  दरम्यान, या सामन्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी धोनीचं कौतुक केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी मॅचनंतर एक ट्वीट केलं. “मी केवळ इतकंच सांगू शकतो की आमच्याकडे Mahi-ndra मध्ये Mahi हे अक्षर आहे, याचा अत्यानंद होतोय. एमएस धोनी जबरदस्त फिनिश,” असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.धोनीची जबरदस्त खेळी प्रत्युत्तरात ऋतुराज गायकवाड गोल्डन डकवर बाद झाला. मिचेल सँटनर ( ११) माघारी परतल्यानंतर  रॉबिन उथप्पा (३०)  व अंबाती रायुडू  ( ४०) या अनुभवी जोडीने अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला.  शिवम दुबेला ( १४) इशान किशनने अप्रतिम झेल घेऊन माघारी पाठवले. डॅनिएल सॅम्सने ३० धावांत ४ विकेट्स घेतल्या. CSK ला अखेरच्या षटकात १७ धावा करायच्या होत्या. उनाडकटने पहिल्या चेंडूवर ड्वेन प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. पण, ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिला आणि त्याने पुढील चार चेंडूंवर ६,४,२,४ अशी फटकेबाजी करून चेन्नईचा विजय पक्का केला. धोनी १३ चेंडूंवर २८ धावांवर नाबाद राहिला.

टॅग्स :आनंद महिंद्रामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्स
Open in App