बर्मिंगहम: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक वर्षानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करत शतक झळकावले. परंतु हे शतक इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांना चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसून आले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये स्मिथने स्मिथने चिडविणाऱ्या इंग्लंडच्या प्रेक्षकांना झुंजार शतकी खेळी करत प्रत्युत्तर दिलं. त्याने 219 चेंडूंत 144 धावा केल्या. यामध्ये त्याने 16 चौकार आणि 2 षटक झळकाविले. या धावांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग 284 धावांपर्यंत पोहोचली. यामध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने 86 धावा देत 5 विकेट्स व क्रिस वोक्सने 3 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी स्मिथ रडतानाचे मुखवटे व टी-शर्ट परिधान करून त्याला चिडवण्याच्या प्रयत्न केला. तसेच डेविड वॅार्नर व बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर देखील प्रेक्षकांनी त्यांची सॅण्ड पेपर दाखवून खिल्ली उडवली.
अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांनी संधी दिली आहे. या तिघांवर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना बॉल टेम्परिंग प्रकरणी बोर्डाने 1 वर्ष निलंबनाची कारवाई केली होती.
दरम्यान विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये भारतीय प्रेक्षकांनी स्मिथला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली याने भारतीय चाहत्यांना स्मिथला डिवचण्याऐवजी टाळ्या वाजवून चांगल्या खेळाला प्रोत्साहन देत टाळ्या वाजवा असा इशारा केला होता. यावेळी विराटच्या खिळाडूवृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.
Web Title: ..And the audience cried Smith in the field
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.