ठळक मुद्देमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी तुम्हाला नवीन नाही.आपल्या भाषणांमधून कधी कधी ते प्रतिस्पर्ध्यांचे चेंडू चांगलेच टोलवतात.आपल्या बोलंदाजीने त्यांनी बऱ्याच जणांची विकेटही काढल्याचे आपण पाहिले आहे.
नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फटकेबाजी तुम्हाला नवीन नाही. कारण आपल्या भाषणांमधून कधी कधी ते प्रतिस्पर्ध्यांचे चेंडू चांगलेच टोलवतात. अगदी गुगलीचाही ते समर्थपणे सामना करतात. त्याचबरोबर आपल्या बोलंदाजीने त्यांनी बऱ्याच जणांची विकेटही काढल्याचे आपण पाहिले आहे. पण ...अन् देवेंद्र फडणवीस एबी डिविलियर्स झाले! हे शिर्षक वाचून तुम्ही थोडेसे चाचपडले असाल. नेमकी ही काय गोष्ट आहे, याचा विचार तुम्ही करत असाल.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून बऱ्याचदा फटकेबाजी केली असली तरी त्यांना क्रिकेटच्या मैदानात मात्र कुणी पाहिले नसेल. काही महिन्यांपूर्वी फुटबॉलच्या एका कार्यक्रमात फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांना पाहिले गेले होते. त्यावेळी फडणवीस यांनी फुटबॉलला चांगलीच किक मारली होती. पण फडणवीस यांना क्रिकेटही चांगले माहित आहे, असे एका उदाहरणावरून दिसून आले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिविलियर्स हे नाव चांगलेच परिचयाचे. दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना त्याने नेत्रदीपक फलंदाजीचा नमुना पेश केला होता. पण आता मात्र तो निवृत्त झाला आहे. डिविलियर्स हा चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा. फडणवीस यांनीही असाच एक फटका क्रिकेटच्या मैदानात मारला आणि लोकांना डिविलियर्सची आठवण आल्यावाचून राहिले नाही. नागपुरात ‘सीएम’ चषकाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस यांनी फलंदाजी करताना ‘रिव्हर्स स्विप’चा फटके मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
मुख्यमंत्र्यांनी कसा मारला ‘रिव्हर्स स्विप’, पाहा हा व्हिडीओ
Web Title: And Devendra Fadnavis became AB de Villiers!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.