Join us  

... आणि चाहत्यांनी पंच विल्सन यांना ठरवलं आंधळं, प्रकरण आलं चव्हाट्यावर

सामन्यात विल्सन यांच्याकडून बऱ्याच चुका पाहायाला मिळाल्या. त्यामुळे एका चाहत्याने तर चक्क विल्सन यांना आंधळं ठरवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 7:37 PM

Open in App

लंडन : सध्याच्या घडीला अॅशेस मालिका सुरु आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ही सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका समजली जाते. साऱ्या क्रिकेट विश्वाचे यावर लक्ष लागून राहिलेले असते. या मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानातील पंच म्हणून वेस्ट इंडिजच्या जोएल विल्सन यांची नियुक्ती करण्यात आली. पण या सामन्यात विल्सन यांच्याकडून बऱ्याच चुका पाहायाला मिळाल्या. त्यामुळे एका चाहत्याने तर चक्क विल्सन यांना आंधळं ठरवलं आहे. फक्त एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने फार मोठे फेरफार केले असून आता प्रत्येकाला ते आंधळे असल्याचे पाहायलाही मिळत आहे. एक मोठे संकेतस्थळ हॅक करून चाहत्याने विल्सन यांना आधळं ठरवत जगाला त्याची दखल घ्यायला लावली आहे.

विल्सन यांच्यावर या चाहत्याच्या कारानाम्यामुळे नामुष्कीची वेळ येऊ शकते. कारण या चाहत्याने चक्क विल्सन यांच्या विकिपिडीयामध्येच बदल केला आहे. विकिपिडीयामध्ये या चाहत्याने विल्सन हे पंच नसून अंध आहेत, असे म्हटले आहे. बऱ्याच जणांनी ही गोष्ट पाहिली असून ती ट्रोलही होत आहे.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019इंग्लंडआॅस्ट्रेलियावेस्ट इंडिज