वेलिंग्टन : न्यूझीलंडचे महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडली यांना पुरस्कारादाखल मिळालेली कार ठेवण्यासाठी १९८६ मध्ये आपल्या संघातील सहकारी खेळाडूंपुढे स्वत:च्या खर्चाने एका आठवड्याच्या सहलीवर नेण्याचा प्रस्ताव ठेवावा लागला होता.
हॅडलीने १९८५-८६ कसोटी मालिकेत आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्कार पटकाविला होता. त्यांना पुरस्कारादाखल ‘एल्फा रोमियो सॅलून’ कार मिळाली होती. न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. पण, ही कार घरी घेऊन जाताना छोटी अडचण होती. न्यूझीलंड क्रिकेट संघटनेतर्फे सर्व रोख पुरस्कार संघाच्या कोषामध्ये जमा केल्या जात होते. त्यामुळे त्यांना कारच्या किमतीएवढा खर्च आपल्या सहकारी खेळाडूंच्या सहलीवर करावा लागला होता. हॅडलीने या घटनेचा उल्लेख करताना इयान स्मिथला ‘स्काय स्पोर्टर्््स’ पोडकास्टवर म्हटले, ‘सिडनी क्रिकेट मैदानावर पुरस्कार वितरण समारंभ होता आणि मला कारची किल्ली प्रदान करण्यात आली. ते कार न्यूझीलंडला पाठविणार होते. मी विचार केला की चांगले आहे.’ते पुढे म्हणाले, ‘पण यात अडचण होती. ही एक वस्तू होती. ज्यावेळी आम्ही मायदेशी परतण्यासाठी विमानात बसलो त्यावेळी व्यवस्थापनाने मला म्हटले, ‘रिचर्ड, तुला ही कार विकावी लागेल. ही रक्कम टीम फंडमध्ये जमा करावी लागेल.’
हॅडली म्हणाले, ‘मी कार ठेवण्यास इच्छुक होतो. मी म्हटले, ‘जर मला कार ठेवायची असेल तर?’ त्यावेळी मला सांगण्यात आले की, मला कारच्या किमतीएवढी रक्कम टीम फंडामध्ये द्यावी लागेल. माझ्या मते, त्यावेळी ही रक्कम ३० ते ३५ हजार न्यूझीलंड डॉलर एवढी होती.’हॅडली म्हणाले, त्यानंतर मी कार ठेवण्यासाठी संघ सहकाऱ्यांना आपल्या ‘लेक टोपो रिसॉर्ट’वर एक आठवड्याची सुटी घालविण्याचा प्रस्ताव दिला.