- रोहित नाईक
जगातील प्रत्येक क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पाहत असतो. कोरोनामुळे यंदा या लीगचे आयोजन सप्टेंबर महिन्यात होत असून आता या लीगसाठी केवळ १२ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळेच कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी अवघे क्रिकेटविश्व आयपीएलकडे डोळे लावून बसले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेनंतर २००५ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना झाला. परंतु, क्रिकेटविश्वातील आर्थिक महासत्ता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) टी-२० क्रिकेटला विरोध होता. तोपर्यंत आयसीसीने २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा निर्णय घेतला. आयसीसीने कसेबसे बीसीसीआयचे मन वळविले. पण बीसीसीआयची नाराजी पूर्ण दूर झाली नव्हती.
भारताने पहिल्या टी-२० विश्वचषकासाठी युवा खेळाडंूचा संघ पाठविला आणि या संघाचा कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी. नवख्या भारतीय संघाकडे टी-२० सामन्यांचा म्हणावा तसा काहीच अनुभव नसल्याने भारतीय संघ कितपत मजल मारणार अशीच चर्चा होती. मात्र ‘कॅप्टन कूल’ धोनीने अत्यंत कल्पक नेतृत्व करताना भारताला थेट विश्वविजेतेपद मिळवून दिले. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला अंतिम सामन्यात नमवून विजेतेपद पटकावल्याने या विश्वविजेतेपदाचा आनंद द्विगुणित झाला होता. त्याच वेळी बीसीसीआयला स्वप्ने पडू लागली ती टी-२० लीगची. या विश्वविजेतेपदानंतर काहीच महिन्यांनी बीसीसीआयने आयपीएलची घोषणा केली आणि पुढच्याच वर्षी २००८ मध्ये पहिल्या आयपीएलचे आयोजन झाले. क्रिकेटचाहत्यांनी या लीगला अक्षरश: डोक्यावर घेतले.
वर्षभराच्या कमाईहून कितीतरी अधिक पटीने कमाई जेमतेम दोन महिने रंगणाऱ्या आयपीएलच्या माध्यमातून होत असल्याने बीसीसीआयसाठी ही स्पर्धा सोन्याची कोंबडीच ठरली. आयसीसीसह सर्वच राष्ट्रीय संघटनांनाही आर्थिक फायदा झाल्याने आयपीएलची लोकप्रियता तसेच याला मिळणारा पाठिंबा वाढत राहिला. ज्या देशाचा टी-२० सामन्यांना विरोध होता, त्याच देशाने क्रिकेटविश्वाला एका रोमांचक व पैशांचा धो-धो पाऊस पाडणाºया लीगची भेट दिली आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि आयपीएल त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. २००२-०३ मोसमात इंग्लंडमध्ये टी-२० क्रिकेटचा प्रयोग हिट झाला आणि वेध लागले आंतरराष्ट्रीय टी-20 चे...
Web Title: ... and the IPL was born
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.