...अन् Shoaib Malik च्या पत्नीला तोंड लपवावं लागलं; सना जावेद का संतापली?

Sana Javed Angry Video : शोएब मलिकची पत्नी सना जावेद पापाराझींवर भडकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 07:20 PM2024-07-17T19:20:20+5:302024-07-17T19:21:56+5:30

whatsapp join usJoin us
...and Shoaib Malik's wife had to hide her face; Why is Sana Javed angry? | ...अन् Shoaib Malik च्या पत्नीला तोंड लपवावं लागलं; सना जावेद का संतापली?

...अन् Shoaib Malik च्या पत्नीला तोंड लपवावं लागलं; सना जावेद का संतापली?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sana Javed Viral Video : पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन पाकिस्तानातील अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएब तिसऱ्यांदा तर त्याची पत्नी सना जावेद दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. अलीकडेच इंग्लंडच्या धरतीवर World Championship of Legends 2024 ची स्पर्धा पार पाडली. यामध्ये पाकिस्तान चॅम्पियन्स संघाकडून शोएब मलिक खेळत होता. आपल्या पतीला चीअर करण्यासाठी सना जावेदनेही तिथे हजेरी लावली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. 

आता सना जावेदचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पापाराझींवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. लंडन येथे सना जावेद स्पॉट झाली असता उपस्थित पापाराझींनी तिचा व्हिडीओ, फोटो काढण्यास सुरुवात केली. पापाराझी फोटो काढत असल्याचे निदर्शनास येताच सना जावेदने संताप व्यक्त करताना फोटो न काढण्यास सांगितले. यावेळी सना तोंड लपवताना दिसली. 

शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडले होते. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे.

Web Title: ...and Shoaib Malik's wife had to hide her face; Why is Sana Javed angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.