Andre Russell, IPL 2022 KKR vs PBKS Live: कोलकाताच्या संघाने पंजाबच्या गोलंदाजांची पिसं काढत सहज सामना जिंकला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकंही पूर्ण न खेळता केवळ १३७ धावा केल्या. उमेश यादवने ४ बळी घेत पंजाबचं कंबरडं मोडलं. त्यानंतर आंद्रे रसलने पंजाबच्या खेळाडूंचा उरलासुरला आत्मविश्वासही धुळीस मिळवला. आंद्रे रसलने तुफानी फटकेबाजी करत तब्बल ८ षटकार खेचले. त्याच्या या खेळीची झलक पाहा.
दरम्यान, १३८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावाची सुरूवातही खराब झाली होती. अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर स्वस्तात माघारी गेले. या दोघांच्या धक्क्यातून कोलकाता सावरत असतानाच राहुल चहरने एकाच ओव्हरमध्ये कोलकाताला दुहेरी धक्का दिला. राहुल चहरने आपल्या पहिल्याच षटकात आधी श्रेयस अय्यरला आणि नंतर नितिश राणाला माघारी धाडलं. विशेष म्हणजे ही ओव्हरदेखील त्याने निर्धाव म्हणजेच मेडन टाकली. पण त्यानंतर आंद्रे रसलने खेळ पालटला. त्याने ३१ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली.
त्याआधी, पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल स्वस्तात माघारी परतला. भानुका राजपक्षेने फटकेबाजीची सुरूवात केली पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो बाद झाल्यानंतर पंजाबची फलंदाजी कोलमडली. शिखर धवन (१६), लियम लिव्हिंगस्टोन (१९), राज बावा (११), शाहरूख खान (०) आणि हरप्रीत ब्रार (१४), राहुल चहर (०) हे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले. रबाडा आणि भानुपक्षेच्या फलंदाजीमुळे पंजाबने कसाबसा १३० चा आकडा ओलांडला.
Web Title: Andre Russell all Sixes Video on one click watch IPL 2022 KKR vs PBKS Live Dre Russ Sixer King
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.