वेस्ट इंडिजच्या संघात दोन वर्षानंतर स्टार अष्टपैलू फलंदाज परतला, KKR ला आनंद झाला

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची गाडी चुकल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडला वन डे मालिकेत पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:09 PM2023-12-10T21:09:24+5:302023-12-10T21:17:29+5:30

whatsapp join usJoin us
Andre Russell is back in West Indies' T20I squad for the upcoming five-match series against England at home | वेस्ट इंडिजच्या संघात दोन वर्षानंतर स्टार अष्टपैलू फलंदाज परतला, KKR ला आनंद झाला

वेस्ट इंडिजच्या संघात दोन वर्षानंतर स्टार अष्टपैलू फलंदाज परतला, KKR ला आनंद झाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची गाडी चुकल्यानंतर वेस्ट इंडिज संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडला वन डे मालिकेत पराभूत केले. आता वेस्ट इंडिज संघाने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची ट्वेंटी-२०  मालिका खेळवली जाणार आहे. जॉस बटलर व इंग्लंडचा संघ १२ ते २१ डिसेंबर या कालावधीत ही मालिका खेळणार आहे.  वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व रोव्हमन पॉवेलकडे सोपवण्यात आले आहे आणि वर्ल्ड कपची तयारी म्हणून दोन वर्षानंतर स्टार अष्टपैलू आंद्रे रसेलचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन झाले आहे.

युवा अष्टपैलू खेळाडू मॅथ्यू फोर्ड याने वन डे मालिकेतील अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्याचा प्रथमच ट्वेंटी-२० संघात समावेश केला गेला आहे. जेसन होल्डर, निकोलस पूरन व कायले मेयर्स यांचाही ट्वेंटी-२० मालिकेत समावेश केला गेला आहे. हे तिघेही वन डे मालिकेला मुकले होते. मागील चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मॅच न खेळलेल्या शेर्फाने रुथरफोर्ड याचेही संघात पुनरागमन झाले आहे. वन डे संघाचा कर्णधार शे होप याच्यावर ट्वेंटी-२०त उप कर्णधारपदाची जबाबदारी आहे. निवड समितीने पहिल्या तीन सामन्यांसाठी १५ सदस्यीय संघ निवडला आहे, त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत बदल होऊ शकतो.  


वेस्ट इंडिजचे निवडक डेसमंड हेन्स म्हणाले, "हे वेस्ट इंडिजसाठी २०२३ मध्ये घरच्या मैदानात होणारी शेवटची T20I मालिका असेल, कारण ते जून २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे ICC T20 World Cup स्पर्धेसाठी दोन यजमान संघांपैकी एक बनण्याची तयारी करत आहेत. आम्ही एक संघ निवडला आहे जो आम्हाला वाटते की आम्हाला त्या स्पर्धेत यश मिळवून देईल."

Image

वेस्ट इंडिजचा संघ ( पहिल्या ३ सामन्यांसाठी) - रोव्हमन पॉवेल ( कर्णधार), शे होप ( उप कर्णधार), रोस्टन चेस, मॅथ्यू फॉर्ड, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, कायले मेयर्स, गुदाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेर्फाने रुथफोर्ड, रोमारिओ शेफर्ड (Rovman Powell (C), Shai Hope (VC), Roston Chase, Matthew Forde, Shimron Hetmyer, Jason Holder,Akeal Hosein, Alzarri Joseph, Brandon King, Kyle Mayers, Gudakesh Motie, Nicholas Pooran, Andre Russell, Sherfane Rutherford, Romario Shepherd)
 

Web Title: Andre Russell is back in West Indies' T20I squad for the upcoming five-match series against England at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.