Russell Nitish Rana, IPL 2022 KKR vs SRH: हैदराबादच्या संघाविरूद्ध कोलकाताने २० षटकात १७५ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून हैदराबादने कोलकाताच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. KKR च्या वरच्या फळीने निराश केले. मधल्या फळीत मात्र नितीश राणा (५४) आणि आंद्रे रसल (४५) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने सनरायजर्स हैदराबादला (SRH) १७६ धावांचे मोठे आव्हान दिले.
कोलकाताच्या डावाच्या सुरूवातीला अजिंक्य रहाणेच्या जागी संधी मिळालेला आरोन फिंच ७ धावांवर बाद झाला. व्यंकटेश अय्यर (६) आणि सुनील नरिन (६) एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर श्रेयस अय्यरला सूर गवसला होता, पण उमरान मलिकने अप्रतिम यॉर्कर टाकून त्या २८ धावांवर तंबूत पाठवले. नितीश राणाने मात्र जबाबदारीने खेळ केला. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर ताकदवान आंद्रे रसलने झोडपणी सुरू केली. त्याने शेवटपर्यंत नाबाद राहात ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४९ धावा कुटल्या. टी नटराजनने ३, उमरानने २ तर मार्को जेन्सन, जगदीश सुचिथ आणि भुवीने १-१ बळी घेतले.
कोलकाता नाइट रायडर्स: आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (किपर), पॅट कमिन्स, सुनील नरिन, उमेश यादव, अमन खान, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (किपर), एडन मार्करम, शशांक सिंग, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जेन्सन, उमरान मलिक, टी नटराजन
Web Title: Andre Russell Nitish Rana fine batting take KKR upto 175 against SRH in IPL 2022 Umran Malik Yorker Natarajan Bhuvneshwar Kumar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.