केकेआरच्या या स्टार खेळाडूचं रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल, शेअर केली न्यूड सेल्फी

Andre Russell Nude Selfie: आंद्रे रसेल याने न्यूड होत आरशासमोर उभे राहत सेल्फी काढली असून, ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या सेल्फीची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या त्या फोटोशूटसोबत केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:48 PM2022-11-19T12:48:00+5:302022-11-19T12:49:14+5:30

whatsapp join usJoin us
Andre Russell star player of KKR followed in the footsteps of Ranveer Singh, shared a nude selfie | केकेआरच्या या स्टार खेळाडूचं रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल, शेअर केली न्यूड सेल्फी

केकेआरच्या या स्टार खेळाडूचं रणवीर सिंहच्या पावलावर पाऊल, शेअर केली न्यूड सेल्फी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

काही महिन्यांपूर्वी अभिनेता रणवीर सिंह याने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे खळबळ उडाली होती. तसेच त्यावरून खूप वादही झाला होता. आता कोलकाता नाईटरायडर्सच्या स्टार अष्टपैलू फलंदाजानेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत न्यूड सेल्फी शेअर करून खळबळ माजवली आहे. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू आंद्रे रसेल याने न्यूड होत आरशासमोर उभे राहत सेल्फी काढली असून, ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या सेल्फीची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या त्या फोटोशूटसोबत केली जात आहे.

३४ वर्षीय आंद्रे रसेल त्याच्या तुफानी खेळासोबतच फिट बॉडीसाठी ओळखला जातो. दरम्यान, रसेलने इंस्टाग्राम स्टोरीवर एक न्यूड सेल्फी अपलोड केली आहे. हा फोटो त्याने वॉर्डरोब सेक्शनमध्ये घेतला आहे. रसेल आरशासमोर उभा राहून सेल्फी घेताना दिसत आहे. तसेच त्याने सेल्फीमध्ये इमोजीच्या मदतीने प्रायव्हेट पार्ट लपवला आहे. रसेलची ही सेल्फी आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

आंद्रे रसेलला कोलकाता नाईटरायडर्सने आयपीएलच्या २०२३ च्या हंगामासाठी रिटेन केलं आहे.  दरम्यान, रसेलने काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामध्ये त्याचा बॉडी फिटनेस दिसत आहे. आंद्रे रसेलच्या या न्यूड सेल्फीवर लोकांकडून भरपूर कमेंट्स केल्या जात आहेत. आता सोशल मीडियावर विविध अकाऊंट्सवरून शेअर केली जात आहे. तसेच रसेलची तुलना रणवीर सिंहशी केली जात आहे.

रसेलची गणना ही जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. त्याच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ७ हजारहून अधिक धावा आहेत. तसेच त्याने ३८१ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत. तसेच त्याने ५६ वनडे, ६७ टी-२० आणि एक कसोटी सामना खेळला आहे.  

Web Title: Andre Russell star player of KKR followed in the footsteps of Ranveer Singh, shared a nude selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.