जमैका : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये विक्रमांचा पाऊस पडत असताना शुक्रवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. वेस्ट इंडिज संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट आंद्रे रसेलच्या डोक्यावर वेगाने चेंडू आदळला. हा आघात इतका वेगवान होता की रसेल मैदानावरच आडवा झाला आणि त्याला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये रसेल जमैका थलावाज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सेंट ल्युसिया झौक्स संघाविरुद्धच्या सामन्यात ही घटना घडली.
सामन्याच्या 14 व्या षटकात झौक्स संघाचा वेगवान गोलंदाज हार्डस विलजोनचा बाऊंसर रसेलच्या डोक्यावर जोरात आदळला. हा चेंडू कानाच्या अगदी जवळ आदळला. त्यानंतर लगेचच रसेल मैदानावर आडवा झाला. त्याच्या अवतीभवती इतर खेळाडू जमले आणि त्यांनी रसेलचा हॅल्मेट बाजूला केले. त्यानंतर त्वरितच वैद्यकिय पथक दाखल झाले आणि त्यांनी रलेसलला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेले.
प्रथम फलंदाजी करताना जमैका संघाने 5 बाद 170 धावा केल्या. 5 बाद 137 धावा असताना हा प्रसंग घडला. जमैकाच्या ग्लेन फिलिप्सने 34 चेंडूंत 58 धावा केल्या, तर युनिव्हर्सल बॉल भोपळा न फोडताच माघारी परतला. रोव्हमन पॉवेलने 22 चेंडूत 44 धावांची उपयुक्त खेळी केली. ओबे मॅकोय आणि फवाद अहमद यांनी प्रत्येकी दोन, तर थिसारा परेराने एक विकेट घेतली.
झौक्स संघाने 16.4 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. आंद्रे फ्लेचर ( 47*) आणि रहकिम कोर्नवॉल ( 75) यांच्या फटकेबाजीनं संघाचा विजय सुकर केला.
Web Title: Andre Russell suffers brutal blow on head, gets stretchered off during CPL 2019 match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.