इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) पहिल्याच कसोटीत भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडनं दोन दिवसांत ५५५ धावा चोपल्या. त्यात रूटनं द्विशतककी खेळी केली. भारत दौऱ्यावर ( India vs England 1st Test) येण्यापूर्वी इंग्लंडनं श्रीलंकेचा दौरा केला आणि तेथेही दोन कसोटी सामन्यांत रुटनं २२८ व १८६ धावांची खेळी केली. तोच फॉर्म चेन्नई कसोटीत ( Chennai Test) कायम राखताना रुटनं ३७७ चेंडूंत १९ चौकार व २ षटकारांसह २१८ धावा कुटल्या. शाहबाज नदीमला त्याची विकेट घेण्यात यश मिळालं.
रुटनं या द्विशतकासह अनेक विक्रमांना गवसणी घातली. आपल्या १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा रूट हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी ८ फलंदाजांनी त्यांच्या १००व्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता आणि त्यात इंझमाम उल हक याची नाबाद १८८ धावांची खेळी ही सर्वोत्तम होती. आता रुटच्या या अफलातून खेळीनंतर इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफ ( Andrew Flintoff ) यानं कौतुक करत बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांना चिमटा काढला. अमिताभ यांनी २०१६मध्ये रुटसाठी एक ट्विट केलं होतं आणि पाच वर्षांनंतर फ्लिंटॉफनं रिट्विटकरून त्याला उत्तर दिलं. Video : मोहम्मद सिराजनं रागात धरला कुलदीप यादवचा गळा; BCCIकडे कारवाईची मागणी
२०१६मध्ये नेमकं काय झालं होतं? २०१६च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानचा हा किस्सा आहे. त्यावेळी फ्लिंटॉफने एक ट्विट केले होते. त्यात त्यानं म्हटलं होतं की, " विराट कोहली जर याच गतीने खेळत राहीला तर तो एकदिवस नक्कीच जो रुटची बरोबरी करु शकेल." १००व्या कसोटीत जो रूटचा World Record!; सुनील गावस्कर यांचाही मोडला विक्रम
अमिताभ बच्चन यांनी फटकारले बिग बींनी त्या ट्विटवर उत्तर देताना म्हटले की, " कोण आहे हा रुट, या रुटला मुळापासून उखडून टाकू..."