Andrew Symonds Death: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) कार अपघातात मृत्यू झाला आहे. क्वीन्सलँड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये शनिवारी रात्री 10:30 च्या सुमारास ही घटना घडली. सायमंड्स यांच्या मृत्यूनंतर क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. विविध क्रिकेटपटू त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. भारतीय क्रिकेटपटू एकेकाळचा सायमंड्स यांचा मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी असलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानेही सायमंड्स यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.
हरभजन सिंग सोबद वादसायमंड्स जेवढा धडाकेबाज खेळाडू होता, तेवढाच तो वादातही अडकायचा. त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक वाद झाले, ज्याची जगभरात आजही चर्चा होते. पबमध्ये भांडणे असो किंवा मैदानावरील भांडणे, सायमंड्सच्या नावावर अनेक वाद झाले. असाच एक वाद झाला, जो 'मंकीगेट' नावाने प्रसिद्ध झाला. सायमंड्सचा हा वाद हरभजन सिंगसोबत झाला होता.
सिडनी कसोटीत 'मंकीगेट' वादही गोष्ट 2007-08 ची आहे, जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 337 धावांनी जिंकला, तर दुसरा सामना 6 जानेवारी 2008 पासून सिडनी येथे खेळला गेला. या कसोटीत सायमंड्स फलंदाजी करत होता. तेव्हा सायमंड्सचे हरभजनसोबत भांडण झाले होते. नंतर सायमंड्सने आरोप केला की, भज्जीने त्याला 'माकड' म्हटले. यानंतर हरभजनवर तीन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.
बीसीसीआयनेही दौरा रद्द करण्याची धमकी दिली होतीया वादामुळे टीम इंडिया दौऱ्याला मध्यावर सोडून परत येण्याच्या टप्प्यावर आली होती. ऑस्ट्रेलियन मीडियाने भज्जीबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या. त्यामुळे बीसीसीआयने दौरा मध्यावर संपवण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत हे प्रकरण सिडनी न्यायालयात पोहोचले. या निर्णयाविरुद्ध अपील करण्यात आली आणि भज्जीने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडला नाही. यानंतर हरभजनवरील तीन कसोटी सामन्यांची बंदी उठवण्यात आली. हे प्रकरण आजही 'मंकीगेट' नावाने ओळखले जाते.
याचा उल्लेखही सचिनने आपल्या आत्मचरित्रात केला सचिन तेंडूलकरने आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे. त्याने लिहीले की, जेव्हा भज्जी आणि मी फलंदाजी करत होतो तेव्हा प्रकरण तापू लागले होते. हरभजनने 50 धावा पूर्ण केल्याने सायमंड्स चिडला होता. त्याने हरभजन सिंगला चिथावणी देण्यास सुरुवात केली. भज्जीने अनेकवेळा येऊन मला सांगितले की, सायमंड्स त्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन त्याला सतत शांत राहण्यास सांगत होता. यावेळी भज्जीने मस्करीत ब्रेट लीच्या पाठीवर थाप मारली, त्यावर फिल्डिंग करत असलेला सायमंड्स चिडला आण त्याचा हरभजनसोबत वाद झाला. सायमंड्सने शिवीगाळ सुरू केल्यामुळे भज्जीही चिडला आणि वाद विकोपाला गेला.
सायमंड्स यांची कारकीर्दसायमंड्स यांनी आपल्या कारकिर्दीत 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले. यामध्ये त्यांनी कसोटीत 1462 धावा, एकदिवसीय सामन्यात 5088 धावा आणि टी-20 मध्ये 337 धावा केल्या. सायमंड्सने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी 39 सामन्यात 974 धावा केल्या.