ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे (Andrew Symonds) शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. 46 वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले येथे अपघात झाला होता. सायमंड्सच्या निधनानंतर, क्रिकेट विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मात्र, आता सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या बहिणीने एक धक्कादायक प्रश्न उपस्थित केला आहे.
सायमंड्सच्या बहिण म्हणाली - ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याचा शनिवारी एका कार अपघातात मृत्यू होण्याच्या शेवटच्या एक तास आगोदरचे गुढ आणखी वाढले आहे. सायमंड्सच्या बहिणीने डेलीमेल डॉट को डॉट यूकेसोबत बोलताना सांगितले, की अपघाताच्या रात्री सायमंड्स सुनसान रस्त्यावर काय करत होता, हे कुटुंबीयांना माहीत नव्हते. सायमंड्सच्या पश्चात पत्नी लॉरा आणि दोन मुलेही आहेत.
भावाच्या आठवणीने भाऊक झाली बहिण - वृत्तानुसार, सायमंड्सची बहीण लुईस म्हणाली, की आपल्याला आपल्या भावासोबत आणखी एक दिवस घालवायची इच्छा आहे. ती पुढे म्हणाली माझ्या भावा परत ये आणि कुटुंबासोबत वेळ घालव. संबंधित वृत्तात लुईसच्या हवाल्याने म्हणण्यात आले आहे की, 'हा अपघात अत्यंत भयानक होता. सायमंड्स तेथे काय करत होता, हे आम्हाला माहीत नाही. पण या अपघातात सायमंड्सचे दोन्ही कुत्रे वाचले आहेत.