नवी दिल्ली : भारताच्या शेजारील देश श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र तरीदेखील श्रीलंकेच्या धरतीवर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. आपल्या देशासाठी १०० कसोटी सामने खेळायचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अलीकडेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इथपर्यंत मजल मारली होती. आता श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने (Angelo Mathews) या विक्रमी आकड्याला गवसणी घातली आहे. रविवार पासून गॉले येथे खेळवला जात असेलल्या पाकिस्तानविरूद्धचा दुसरा कसोटी सामना मॅथ्यूजच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना आहे.
एकदिवसीय सामन्यातूनच ॲंजेलो मॅथ्यूजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सुरूवातील मधल्या फळीतील एक फलंदाज आणि गोलंदाज म्हणून त्याची ओळख होती. कालांतराने त्याने संघाच्या कर्णधारपदापर्यंत मजल मारली आणि आपल्या ऑलराउंडर खेळीने अवघ्या क्रिकेट जगाचे लक्ष वेधून घेतले. मागील दोन वर्षांमध्ये मॅथ्यूजला टी-२० आणि एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र कसोटी संघातील त्याचे स्थान कायम राहिले. मे महिन्यात त्याने बांगलादेशविरूद्ध १९९ आणि १४५ धावांची खेळी करून ७,००० धावांचा टप्पा गाठला आहे.
माझ्यात आणखी क्रिकेट शिल्लक आहे - मॅथ्यूज
"इंग्लंडच्या संघाचा गोलंदाज जेम्स ॲंडरसन माझ्यासाठी प्रेरणादायी आहे कारण तो ज्या पद्धतीने ४० व्या वर्षात खेळी करत आहे. माझ्यामध्ये देखील आणखी काही वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. वय केवळ एक आकडा आहे आणि मी माझ्या फिटनेसवर चांगली मेहनत करेन." असे १०० वा कसोटी सामना खेळण्याच्या आधी मॅथ्यूजने सांगितले.
१०० कसोटी सामने खेळणारे श्रीलंकेचे खेळाडू
महेला जयवर्धने - १४९ सामने
कुमार संगकारा - १३४ सामने
मुथैया मुरलीधरन - १३२ सामने
चमिंडा वास - १११ सामने
सनथ जयसूर्या - ११० सामने
ॲंजेलो मॅथ्यूज - १०० सामने
Web Title: Angelo Mathews has become the 6th player to play 100 Test matches for Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.