भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेत ( India vs England) अम्पायर्स कॉल ( Umpires Call) आणि सॉफ्ट सिग्नल ( Soft Signal) या नियमांवरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष करून कसोटी मालिकेत DRS घेतल्यानंतर केवळ Umpires Call मुळे प्रतिस्पर्धी फलंदाजाला नाबाद ठरवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अम्पायर्स कॉलमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. विराटची ही मागणी मान्य होणं कठीण असल्याचे दिसत आहे. आयसीसी क्रिकेट समितीचे (ICC Cricket Committee) अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक व दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे ( Anil Kumble) यांनी या नियमात कोणताही बदल करू नये अशी शिफारस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC) केली आहे. ( Anil Kumble headed committee asks ICC to stick with the existing rule) 'Soft Signal'वर भडकला विराट कोहली; म्हणाला, अम्पायरकडे I don't know call हा पर्याय का नाही?
ESPN Cricinfo नं दिलेल्या वृत्तानुसार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं अम्पायर्स कॉलचा नियम आहे तसाच राहील अशी शिफारस केली आहे. कुंबळेसह या समितीत राहुल द्रविड, माहेला जयवर्धने, अँड्य्रू स्ट्रॉस आणि शॉन पोलॉक यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. अम्पायर्स कॉलमध्ये बदल न करण्याची शिफारस प्रसारणकर्ते, मॅच अधिकारी आणि हॉक आय स्पेशलिस्ट यांच्याशी बोलून करण्यात आली आहे. येत्या ३० मार्चला आयसीसीची बैठक पार पडणार आहे. यात अम्पायर्स कॉल नियमाबाबत चर्चा केली जाण्याची अपेक्षा आहे. जबरा फॅन...!; टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'तो' चक्क टेकडीवर जाऊन बसला अन्...
अनिल कुंबळे व विराट कोहली यांच्यात वाद?
२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली व तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. अनिल कुंबळे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला होता. त्यामुळे अम्पायर्स कॉलच्या निर्णयावरून पुन्हा हे दोघं आमनेसामने आल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील नियमांवरून रवी शास्त्री व विराट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे नियम ठरवण्यात आले होते. वडिलांची हॅट, शूज अन् कपडे घेऊन हार्दिक-कृणाल पांड्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले, Photo Viral