T20 World Cup 2024 IND vs PAK : आयर्लंडवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही हायव्होल्टेज मॅच पाहण्यासाठी अमेरिकेतील चाहते उत्सुक आहेत. पण, कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) पुन्हा दुखापत झाल्याने भारतीय चाहते चिंतीत झाले आहेत. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात खांद्याला चेंडू लागल्यानंतर रोहितने रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला होता. आज त्याला नेटमध्ये सराव करताना अंगठ्याला चेंडू लागला आणि त्यात जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसनच्या पोस्टने IND vs PAK लढतीला रोहित मुकणार असल्याच्या चर्चांना हवा दिली.
संजनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं की, जसप्रीत बुमराहला टॉस करताना पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. तिच्या या पोस्टनंतर रोहित IND vs PAK लढतीला मुकणार असल्याचा अंदाज चाहते बांधू लागले आहेत. काही चाहत्यांनी असा अंदाज लावला की ही पल्बिसिटीसाठी केलेली पोस्ट असू शकते, तर काहींनी रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल चिंता व्यक्त केली. जसप्रीत बुमराहनेही 'मी टॉससाठी तयार आहे!' अशी पोस्ट केली आहे.
रोहितला पुन्हा चेंडू लागला, खेळपट्टीबाबत आयसीसीकडे तक्रारशुक्रवारी केंटिज पार्कवर नेटमध्ये सराव करत असताना रोहितच्या डाव्या हाताच्या ग्लोव्हमध्ये चेंडू लागला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या हाताला चेंडू लागला होता. त्यानंतर तो सामना अर्धवट सोडून गेला. आज तो सरावासाठी आला होता. श्रीलंकेचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट नुवान चेंडू टाकत होता. अचानक चेंडू उसळला आणि त्याच्या गोल्व्हजला लागला. खूप वेदना होत होत्या, फिजिओ त्याला भेटायला आले, पण त्याने पुन्हा सराव सुरू केला. यानंतर त्याने काही काळ दुसऱ्या टोकाकडून फलंदाजी केली. विराटलाही येथे अनेक चेंडू खेळताना त्रास झाला. यानंतर बीसीसीआयने अधिकृतरीत्या खेळपट्टी आणि सराव खेळपट्टीबाबत आयसीसीकडे तक्रार केली.