Join us  

पलटी मास्टर ! Asia Cup 2023 हायब्रिड मॉडेलला आधी विरोध, आता पाकिस्तानने 'कमिटमेंट' दिलीय म्हणून...

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB ) नेमकं काय चाललंय, हेच त्यांना माहित नसावं... नजम सेठी यांनी फार आदळआपट करूनही बीसीसीआय PCB समोर झुकले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:11 AM

Open in App

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB ) नेमकं काय चाललंय, हेच त्यांना माहित नसावं... नजम सेठी यांनी फार आदळआपट करूनही बीसीसीआय PCB समोर झुकले नाही. त्यामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये घेण्याचा निर्णय झाला. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान ( ४ सामने) व श्रीलंका ( ९ सामने) येथे ही स्पर्धा खेळवली जाईल. पण, PCBचे पुढील अध्यक्ष झाका अश्रफ ( Zaka Ashraf) यांना हा निर्णय काही पटला नाही आणि त्यांनी हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा आशिया चषक स्पर्धेसमोर संकट उभे राहिले होते. पण, पलटी मास्टर असलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. 

नजम सेठी यांनी PCB च्या अध्यक्षपदासाठी पुन्हा रिंगणात न उतरण्याचा निर्णय जाहीर केला अन् अश्रफ यांचे नाव पुढे आले. त्यानंतर पहिल्याच पत्रकारपरिषदेत त्यांनी आशिया चषक २०२३ बाबत मोठं विधान केलं. BCCI च्या दबावामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमान असूनही पाकिस्तानला ४ सामने आयोजन करण्याचा मान मिळाला. त्यावर अश्रफ यांनी नाराजी व्यक्त केली. पण, आता त्यांनी त्यांच्याच विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. PCB ने आधी घेतलेल्या निर्णयात आम्ही कोणताच अडथळा निर्माण करणार नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. 

 "हे संपूर्ण हायब्रीड मॉडेल पाकिस्तानसाठी फायदेशीर नाही आणि मला ते आवडले नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे," असे अश्रफ म्हणाले. “यजमान असल्याने संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली गेली पाहिजे, यासाठी पाकिस्तानने अधिक चांगली वाटाघाटी करायला हवी होती. पाकिस्तानला फक्त चार सामने मिळाले आणि श्रीलंकेत ९ सामने होणे हे  आपल्या देशाच्या हिताचे नाही,” असेही ते म्हणाले.

पुढे त्यांनी सारवासारव केली की, “परंतु मला दिसत आहे, की हा निर्णय आधीच झाला आहे, म्हणून आम्हाला त्याबरोबर जावे लागेल. मी विरोध करणार नाही किंवा निर्णयाचे पालन न करण्याचा कोणताही हेतू नाही. मी त्याबद्दल फार काही करू शकत नाही, परंतु PCBच्या वचनबद्धतेचा आदर करणे गरजेचा आहे. पण पुढे जाऊन आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय देशाच्या हितासाठी आणि हितासाठी घेतला जाईल.”

टॅग्स :एशिया कप 2022पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App