Join us  

मोठा खेळाडू बनण्याकडे अनुजची वाटचाल - डुप्लेसिस

आपल्या आक्रमक ६६ धावांच्या खेळीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनुज रावतवर कर्णधार फॅफ डुप्लेसिसने स्तुतिसुमने उधळली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 9:25 AM

Open in App

पुणे : आपल्या आक्रमक ६६ धावांच्या खेळीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनुज रावतवर कर्णधार फॅफ डुप्लेसिसने स्तुतिसुमने उधळली आहेत. अनुजची एक मोठा खेळाडू बनण्यासाठी वाटचाल सुरू झाली आहे, या शब्दात डुप्लेसिसने त्याचे कौतुक केले.

यंदाच्या आयपीएलमध्ये कर्णधार डूप्लेसिससोबत डावाची सुरुवात करणाऱ्या अनुज रावतची बॅट सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्यावर रुसली होती. मात्र शनिवारी बलाढ्य मुंबईविरुद्ध त्याने ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी करत अनेकांचे लक्ष वेधले. या खेळीत त्याने तब्बल ६ षटकार आणि ५ चौकार ठोकले. या कामगिरीमुळे सामनावीराचा मानकरी ठरलेल्या अनुजच्या पाठीवर कर्णधाराचीही कौतुकाची थाप पडली. डूप्लेसिस म्हणाला, ‘मैदानावर असताना अनुजमधील विजिगिषु वृत्तीचा परिचय होतो. त्यामुळेच मला त्याच्यामध्ये भविष्यातील मोठा खेळाडू दिसतो.’ २०२१ च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणाऱ्या रावतला यंदा आरसीबीने आपल्या संघात घेतले. त्याआधी त्याने २०१७ सालच्या रणजी मोसमात दिल्लीकडून पदार्पण केले होते.

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App