Join us

"लहानपणापासून वाचत असलेला पेपर पण खोट्या बातम्या छापायला लागला", 'त्या' प्रकरणावरून विराट संतापला

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लिश वर्तमानपत्राच्या एका बातमीवरून संताप व्यक्त केला आहे.

By ओमकार संकपाळ | Updated: August 15, 2023 19:14 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लिश वर्तमानपत्राच्या एका बातमीवरून संताप व्यक्त केला आहे. खरं तर अलीकडेच विराटने पत्नी अनुष्का शर्मासोबत अलिबाग येथील त्यांच्या फॉर्महाऊसच्या जागेची पाहणी केली होती. मात्र, टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीवरून विराटने खडेबोल सुनावले आहे. लहानपणापासून वाचत असलेला पेपर देखील आता खोट्या बातम्या छापायला लागला असल्याचे विराटने म्हटले आहे. 

इंग्लिश वृत्तपत्राच्या बातमीचा फोटो शेअर करत विराटने संताप व्यक्त केला. "लहानपणापासून जे वृत्तपत्र वाचत आलो आहे, ते देखील आता खोट्या बातम्या छापायला लागले आहे", अशा शब्दांत विराटने नाराजी व्यक्त केली. लक्षणीय बाब म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अलिबागच्या फार्महाऊसवर क्रिकेटची खेळपट्टी बांधणार असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. याचाच दाखला देत विराटने सडकून टीका केली. 

 

दरम्यान, विराटने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी ठेवून हा मुद्दा निदर्शनास आणून दिला. एकूणच ही बातमी खोटी असल्याचे किंग कोहलीने म्हटले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या फार्महाऊसचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याची पाहणी करण्यासाठी ही जोडी अलिबागच्या दौऱ्यावर गेली होती. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती. या जोडीने मागील वर्षी अलिबागमधील झिराड येथे ८ एकर जमिनीत खरेदी केली. ही जमीन झिराडमधील अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. समीरा हॅबिटॅट्सने ही जागा दाखवल्यानंतर या दोघांना ही देखणी जागा खूप आवडली आणि त्यांनी ती लागलीच खरेदी केली. या जागेवर सुमारे २० हजार चौरस फूटाचे ड्फार्म हाऊसचे बांधण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माफेक न्यूजभारतीय क्रिकेट संघ
Open in App