भारतीय पुरूष क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या यूएईमध्ये ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी आहे. यासोबतच स्थानिक पातळीवरही क्रिकेट सामने सुरू आहेत. यात अंडर-१९ वनडे चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत एक अशी कमालीची घटना घडली की ज्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियात एक मोठा गोंधळ उडाला आहे.
कर्णधार अनुष्का शर्मानं ठोकलं शानदार अर्धशतक असा बातमीचा मथळा वाचून तुमचाही गोंधळ उडाला असेल. पण हे खरं आहे. पण अर्धशतक ठोकणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा नसून महिला क्रिकेटपटू अनुष्का शर्मा आहे. जयपूरमध्ये सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ-अ आणि महिला संघ-ब यांच्यात क्रिकेट सामना खेळविण्यात आला. यात भारतीय महिला क्रिकेटच्या 'ब' संघाचं नेत्तृत्व महिला क्रिकेटपटू अनुष्का शर्मा हिच्याकडे देण्यात आलं होतं. अनुष्का शर्मानं या सामन्यात शानदार ७२ धावांची खेळी साकारली. सामन्याचं स्कोअरकार्ड बीसीसीआयच्या वुमन क्रिकेटच्या हँडलवरुन ट्विट करण्यात आलं आणि सामन्याची माहिती देण्यात आली. यात अनुष्का शर्माचं नाव वाचून नेटिझन्सचा गोंधळ उडाला.
महिला क्रिकेटपटू अनुष्का शर्मानं सामन्यात सलामीला फलंदाजी करत ७३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. तसंच तृषासोबत १८८ धावांची भागीदारी रचली. पण नेटिझन्समध्ये अनुष्का शर्मा ही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा असल्याचा गैरसमज निर्माण झाला. त्यानंतर सोशल मीडियात मिम्सचा जोरदार पाऊस पडला. पण यात केवळ नाम साधर्म्य असून दुसरं काहीच नाही हे नंतर लक्षात आलं खरं पण तोवर सोशल मीडियात मिम्सचं वादळ घोंगावलं होतं. नेटिझन्सनं विराट आणि अनुष्काबाबत अनेक हटके मिम्स बनवले. अनेकांनी तर भारतीय संघ एका बाजूला निराशाजनक कामगिरी करत असताना दुसरीकडे कर्णधार कोहलीची पत्नी अनुष्का दमदार फॉर्मात असल्याचं म्हणत खोचक टोलेबाजी देखील केली गेली.
Web Title: anushka sharma fifty in womens under 19 one day challenger trophy social media memes virat kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.