Rohit Sharma Anushka Sharma Hug Video : टी२० वर्ल्डकप पाठोपाठ टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही जिंकून स्वत:ला सिद्ध केले. भारतीय संघाने रविवारी न्यूझीलंडविरूद्ध ( IND vs NZ ) खेळताना ४ गडी आणि ६ चेंडू राखून पराभूत केले. फायनलच्या सामन्यात न्यूझीलंडने ( New Zealand ) डॅरेल मिचेल (६३) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकात ७ बाद २५१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (७६), श्रेयस अय्यर (४८) आणि केएल राहुल (नाबाद ३४) या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर सर्वच खेळाडू आणि त्यांचे आप्तेष्ट एकमेकांना आलिंगन देऊन आणि गळाभेट घेऊन विजयोत्सव साजरा करताना दिसले. त्यात रोहित शर्मा आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यातील गळाभेट विशेष चर्चेत राहिली. ( Viral Video trending on social media ).
२०१९च्या सुरुवातीला विराट आणि रोहित यांच्यात सारेकाही आलबेल नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. परिणामी भारतीय संघाला अनेक सामन्यांत आणि स्पर्धांमध्ये पराभूत व्हावे लागल्याचेही बोलले गेले. पण अखेर विराट आणि रोहित यांनी स्वत:हून स्पष्ट केले की त्यांच्यात कुठलाही वाद नाही. तसेच, २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकप आणि २०२५ मध्ये वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून या जोडीने हे सिद्धही केले. विराटची पत्नी अनुष्का आणि रोहितची पत्नी रितिका यांच्यातही बराच काळ अबोला होता. पण काही दिवसांपूर्वी या दोघी बाजूला बसून मॅच पाहत होत्या आणि गप्पाही मारत होत्या. त्यात काल भारतीय संघाच्या विजयानंतर रोहित मैदानात साऱ्यांकडून अभिवादन स्वीकारत असताना अनुष्कानेही त्याचे अभिनंदन केले. इतकेच नव्हेतर तिने रोहितची गळाभेट घेत त्याला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. विराट आणि रोहित दोघांमधील वाद पूर्णपणे शमल्याचे दिसत असल्याने भारतीय चाहतेही आनंदले आहेत.
दरम्यान, भारताने सामना जिंकला असला तरीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगली झुंज दिली. भारतीय डावाच्या सुरुवातीला रोहित शर्माने तडाखेबाज फलंदाजीने प्रारंभ केला होता. रोहित ज्या वेगाने खेळत होता त्यावेगाने भारत ३०-३५ षटकात सामना जिंकू शकला असता. पण शुबमन गिल आणि विराट कोहली झटपट बाद झाल्याने तो डाव काहीसा फसला. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला विजयासाठी शेवटपर्यंत झुंजवले. अखेर ४९व्या षटकात भारताला विजय मिळवला आला.
Web Title: Anushka Sharma hugs Rohit Sharma with joy after team India wins Champions Trophy Final Video goes viral trending IND vs NZ
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.