नवी दिल्ली : वेस्ट इंडिजमधल्या कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने हॅट्रिक घेत इतिहास रचला. या दौऱ्यावरून बुमरा मायदेशी परतला आणि एका मुलाखतीमध्ये तो चांगलाच दडपणाखाली आहे. या मुलाखतीमध्ये त्याला अनुष्का शर्मा की दीपिका पदुकोण यांच्यामध्ये जास्त हॉट कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नवर बुमराने नेमके काय उत्तर दिले ते जाणून घ्या...
एका यु-ट्युब वाहिनीसाठी ही मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी बुमराला हा प्रश्न विचारण्यात आला. सुरुवातीला बुमरा या प्रश्नावर काहीच बोलला नाही. पण मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने पुन्हा हाच प्रश्न विचारला. त्यावेळी बुमरा धर्मसंकटात सापडला होता. त्यानंतर त्याला विचारण्यात आले, अनुष्का कोण आहे, हे तुला माहितीच असेल? हे सांगितल्यावर बुमरावरील दडपण वाढेलेले पाहायला मिळाले. पण बुमराने या प्रश्नामधून आपली सुटका करून घेतली. बुमरा म्हणाला की, तुम्ही दिलेले पर्याय सुरक्षित नाहीत. बुमरा या प्रश्नातून सहीसलामत बाहेर पडला. त्यानंतर त्याला आलिया भट किंवा परिणीती चोप्रा यांच्यामध्ये कोण हॉट वाटते, हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बुमरा म्हणाला की, " मी आलियाचे काही फोटो आणि सिनेमे पाहिले आहेत."
भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतीने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या 418 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 100 धावांत तंबूत परतला. या विजयात बुमराहचे मोठे योगदान ठरले. त्यानं या कसोटीत 6 विकेट्स घेतल्या. याच कामगिरीच्या जोरावर बुमराहने आयसीसी क्रमवारीत 9 स्थानांची मोठी झेप घेतली.
बुमराहने दुसऱ्या डावात 7 धावांत 5 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कमी धावा देऊन पाच विकेट घेणारा बुमराह हा यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम वेंकटेश राजू ( 6 /12 वि. श्रीलंका, 1990) याच्या नावावर होता. पण, याहीपेक्षा या पाच विकेट बुमराहसाठी विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या ठरल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा चारही देशांत एकाच कसोटीत पाच विकेट घेण्याचा पराक्रम करणारा बुमराह हा पहिला भारतीय आणि आशियाई गोलंदाज ठरला. वकार युनिस, वसीम अक्रम, कपील देव, मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे, हरभजन सिंग आदी दिग्गजांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही. या कामगिरीच्या जोरावर बुमराहनं क्रमवारीत 9 स्थानांची सुधारणा केली. त्यानं 7 व्या क्रमांकावर झेप घेतली. त्याचवेळी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टनं दोन स्थानांच्या सुधारणेसह अव्वल पाचात स्थान पटकावलं.