Join us

लग्नासाठी विराट-अनुष्का यांनी घेतला खोट्याचा सहारा; नेमकं कारण काय?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे फेव्हरीट कपल आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 18:42 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे फेव्हरीट कपल आहेत. त्यामुळे ही जोडी विरुष्का या टोपण नावाने ओळखली जाते. हे दोघेही वेळातवेळ काढून एकमेकांना पुरेसा वेळ देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. पण, ही जोडी त्यांच्या प्रेम प्रकरणावर सार्वजनिकरित्या कधी बोलत नाही. फार क्वचितच आणि फार कमीच किस्से त्यांचे ऐकीवात आले असावेत. पण, या जोडीला लग्नासाठी खोट्याचा आधार घ्यावा लागला होता, हे तुम्हाला माहित आहे का?

विरुष्का जोडीनं त्यांचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी खोटं बोलले नव्हते. हा किस्सा अनुष्कानं दिलेल्या एका मुलाखतीतून स्पष्ट केला. विरुष्कानं त्यांच्या लग्नाची गुप्तता पाळण्यासाठी कॅटररला स्वतःची खोटी नावं सांगितली होती. अनुष्कानं सांगितले की,''आम्हाला कौटुंबिक लग्न हवं होतं. आमच्या लग्नात केवळ जवळचे 42 नातेवाईक होते. आम्हाला मोठे थाटामाटात लग्न नको हवं होतं. त्यांना आपलं लग्न गुप्त ठेवायचे होते.''

विरुष्का 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नातील प्रत्येक क्षण आणि बातमी मिळवण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनुष्का म्हणाली,''आमच्या लग्नाची बातमी मीडियात लिक होऊ नये, असे मला वाटायचे. त्यामुळे कॅटररला सांगताना आम्ही आमचं नाव खोटं सांगितले होते. विराटनं त्याचं नाव राहुल सांगितले होते.'' विराट आणि अनुष्का यांनी चार वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर गुपचुप लग्न केले होते. 

कौतुकास्पद ! विरुष्का विकणार लग्नाचे फोटो, मिळणा-या पैशातून करणार समाजकार्य

लग्न करताच विरुष्का झाले ६०० कोटींचे मालक!!

अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहली, सोबत क्रिकेट खेळायचे - अनुष्काच्या आजीने केला खुलासा 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माविरूष्का