मुंबई - सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचीच जादू पसरल्याचं पाहायला मिळत आहे. अनुष्का शर्मा तिचा आगामी सिनेमा 'परी'मुळे चर्चेत आहेत तर दक्षिण आफ्रिकेविरोधात केलेल्या धुव्वादार खेळीमुळे विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 'रनमशिन' विराट कोहलीच्या धमाकेदार नाबाद दीडशतकानंतर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकताना दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवला. या शानदार विजयासह विराट सेनेने सहा सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
याच सामन्यात विराट कोहलीनं नाबाद 160 धावा ठोकल्यानंतर पत्नी अनुष्कानंही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. सोशल मीडियावर एका मागून एक धडाधड पोस्ट करत अनुष्कानं विराटच्या खेळीची प्रचंड प्रशंसा केली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर पती कोहलीचे फोटो शेअर करत त्याला चीअर केले. 'What A Guy', असं कॅप्शन देत तिनं इन्स्टा स्टोरीमध्ये कोहलीचे फोटो शेअर केले आहेत. विराटचे हे फोटो यानंतर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. पती विराट कोहलीला अशा पद्धतीनं चीअर करण्याचा अनुष्का शर्माचा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंडच भावल्याचं यावरुन दिसत आहे. केवळ अनुष्काच नाही तर विराट कोहलीनं देखील जाहिररित्या आपल्या प्रेमाचं दर्शन लोकांना घडवलं आहे. सेंचुरियन टेस्ट मॅचदरम्यान विराटनं 150 धावा ठोकल्यानंतर त्यानं हेलमेट काढून आपल्या वेडिंग रिंगला किस केले होते.
कोहली-धवन यांची फटकेबाजी
न्यूलँड्सच्या मैदानावर नाणेफेक जिंकून यजमानांनी भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. मात्र, कर्णधार कोहलीच्या दमदार दीडशतकाच्या तडाख्यापुढे त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. कोहलीने १५९ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांसह नाबाद १६० धावांचा तडाखा दिला. त्याचवेळी, सलामीवीर शिखर धवननेही दमदार अर्धशतकी खेळी करताना ६३ चेंडूत १२ चौकारांसह ७६ धावा काढल्या.
महत्त्वाचे...
कर्णधार म्हणून खेळताना विराट कोहलीने १२वे एकदिवसीय शतक झळकावले. सर्वाधिक शतके ठोकणा-या कर्णधारांच्या यादीत कोहली ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२२) आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स (१३) यांच्यानंतर तिस-या स्थानी. यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौ-यामध्ये पाचव्यांदा कागिसो रबाडाने रोहित शर्माला बाद केले.
34 तुफान फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीने ३४ शतक ठोकले असून सर्वाधिक शतक झ्ळकावणाºयांच्या यादीत त्याच्यापुढे केवळ सचिन तेंडुलकर (४९) आहे. नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि अनुभवी एबी डिव्हिलियर्स यांच्या अनुपस्थिततेची कमतरता पुन्हा एकदा यजमानांना भासली. या दोघांच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कमजोर बनली.
Web Title: anushka sharma shows love for virat kohli century what a guy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.