कोरोना व्हायरसच्या संकटात केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. त्या दोघांनी आसाम व बिहार येथील पुरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. त्यांनी इतरांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या दोघांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक निवेदन जाहीर केलं आहे.
139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक!
IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?
''आपला देश कोरोना व्हायरसशी मुकाबला करत असताना आसाम आणि बिहार येथील लोकांना पुराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधरावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो. अनुष्का आणि मी आसाम व बिहार येथील पुरजन्य स्थितीत मदतीचं काम करणाऱ्या तीन स्वयंसेवी संस्थांना मदत करत असल्याचे जाहीर करत आहोत. तुम्हीही हातभार लावा,''असे दोघांनी निवेदनात म्हटले आहे.