Virat Kohli T20 World Cup: 'तुमच्या बेडरुममध्ये असं झालं तर...', विराटच्या खोलीचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर अनुष्का संतापली

Anushka's Reaction On Virat Leak Video: विराट कोहलीच्या बेडरुमचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने संताप व्यक्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 02:36 PM2022-10-31T14:36:59+5:302022-10-31T14:37:31+5:30

whatsapp join usJoin us
Anushka Sharma's Reaction On Virat Kohli's Leak Video | Says- 'If this would have happened in your bedroom?', | Virat Kohli T20 World Cup: 'तुमच्या बेडरुममध्ये असं झालं तर...', विराटच्या खोलीचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर अनुष्का संतापली

Virat Kohli T20 World Cup: 'तुमच्या बेडरुममध्ये असं झालं तर...', विराटच्या खोलीचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर अनुष्का संतापली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli: T-20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या विराट कोहलीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. विराटच्या हॉटेल रुममध्ये एक फॅन घुसला आणि रुमसह विराटच्या सामानाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे संतापलेल्या कोहलीने प्रायव्हसीचा मुद्दा उचलून धरला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

चाहत्याने विराटच्या खोलीत जाऊन व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. यासोबतच त्याने किंग कोहलीची हॉटेलची खोली असे कॅप्शनही दिले. आता या प्रकरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विराटसह त्याची पत्नी अनुष्कानेही या प्रकरणावर संताप व्यक्त केला. अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत असे करणाऱ्याला चांगलेच सुनावले. 
खूप वाईट वागणूक

अनुष्काने लिहिले की, ''यापूर्वीही आमच्यासोबत अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा चाहत्यांनी आम्हाला दया दाखवली नाही. पण, आताची घटना खूप निंदनीय आणि अपमानकारन आहे. तुम्हाला वाटत असेल की, सेलिब्रिटी आहोत तर सहन करावे लागेल. पण, तुम्हीदेखील या व्यवस्थेचा भाग आहात. स्वतःवर थोडा संयम ठेवावा. तुमच्या बेडरुममध्ये ही घटना घडली असती तर काय केले असते...?"

विराट म्हणाला - मला भीती वाटते


विराटने हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून चाहते खूश होतात, हे मी समजतो. मी कायमचं याचे कौतुक करत आलोय. परंतु हा व्हिडीओ घाबरवणारा आहे आणि मी माझ्या प्रायव्हसीबाबत चिंतीत आहे. जर मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर पर्सनल स्पेसची मी कुठे अपेक्षा करू. अशा प्रकारच्या गोष्टींशी मी सहमत नाही. लोकांच्या प्रायव्हसीचा सन्मान करा, त्यांना आपल्या मनोरंजनाचे साधन समजू नका,” असे विराट म्हणाला.

यापूर्वीही झाला होता वाद
टी20 विश्वचषक स्पर्धेत ही पहिलीच वेळ नाही जेव्हा कोहली किंवा टीम इंडिया वादात सापडली नाही. सिडनीमध्ये भारतीय संघाला खाण्यासाठी थंड सँडव्हिच देण्यात आलं होतं. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी ते खाण्यास नकार दिला होता. यानंतर मोठा वाद झाला होता आणि आयसीसीलाही स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. आता विराटच्या रुममध्ये फॅन शिरल्याची घटना घटली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Web Title: Anushka Sharma's Reaction On Virat Kohli's Leak Video | Says- 'If this would have happened in your bedroom?',

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.