मुंबई : ‘युवराज सिंगच्या समावेशाने संघाची मधली फळी मजबूत बनली आहे. त्यामुळे आता मी सलामीला खेळू शकतो,’ असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले. तसेच, ‘युवीच्या आगमनाने संघ मजबूत झाला असून खेळाडूंचा आत्मविश्वासही उंचावला आहे,’ असे मुंबई इंडियन्सचा संचालक आणि माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने सांगितले.आयपीएलच्या १२व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होणार असून गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल्स चॅलेंजर बंगलोर यांच्यात सलामीची लढत रंगेल. पण, या सामन्यापेक्षा सर्वांना उत्सुकता लागली आहे ती युवराज सिंगच्या फटकेबाजीची. युवी यंदा प्रथमच मुंबई इंडियन्सकडून खेळेल आणि संघाने सोमवारीच युवीचे जोरदार स्वागतही केले. पण, मुंबई इंडियन्सच्या अंतिम ११ खेळाडूंत युवीला संधी मिळेल की नाही, याबाबत गूढ कायम आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी याबाबत वक्तव्य करताना गरज पडल्यास युवीसाठी फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची तयारीही त्याने दर्शवली.युवीच्या येण्याने संघ आणखी मजबूत झाल्याची प्रतिक्रिया झहीर खानने दिली. झहीर म्हणाला, ‘लिलावात बऱ्याच खेळाडूंवर बोली लागली नाही. माझ्यावरही पहिल्या टप्प्यात बोली लागलेली नव्हती. लिलावात प्रत्येक संघ एक रणनीती ठरवून बोली लावतो. त्यामुळेच युवराजला अखेरच्या फेरीत का घेतले, पहिल्या फेरीत का नाही, यावर उत्तर देऊ शकत नाही. पण, युवराज ताफ्यात दाखल झाल्यामुळे संघात चैतन्य संचारले आहे.’युवराजच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्सचा संघ संतुलित झाला असल्याचे मत व्यक्त करताना रोहित म्हणाला, ‘युवीच्या येण्याने मधल्या फळीत आम्हाला सक्षम पर्याय मिळाला आहे. त्यामुळे मला सलामीला खेळता येईल. युवी मॅच विनर आहे. याआधीही मी मुंबई इंडियन्ससाठी काही सामन्यांत सलामीला आलो आहे, परंतु युवीच्या येण्याने मधल्या फळीचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात मुंबईकडून सलामीला मीच येणार.’गरज पडल्यास युवीसाठी फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची तयारीही रोहित शर्माने दर्शवली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- युवीमुळे चिंता मिटली; मी सलामीला खेळणार - रोहित शर्मा
युवीमुळे चिंता मिटली; मी सलामीला खेळणार - रोहित शर्मा
‘युवराज सिंगच्या समावेशाने संघाची मधली फळी मजबूत बनली आहे. त्यामुळे आता मी सलामीला खेळू शकतो,’ असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:19 AM