हर्षा भोगले लिहितात...
वन-डे संघाची निवड करणे म्हणजे संघबांधणी करणे असते. प्रत्येक चार वर्षांनी होणाºया विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती यशस्वी ठरणार का, याची चाचणी सुरू असते. आज निवड झाली तरी तुम्ही भविष्यासाठी चांगली तयारी करीत असता. टी-२० संघाची निवड करणे खडतर असते. प्रत्येक लढतीसाठी योग्य खेळाडूची निवड करावी लागते. उदाहरण द्यायचे झाल्यास ३८ व्या वर्षी आशिष नेहराची झालेली निवड, हे आहे. या सिनिअर खेळाडूवर आतापर्यंत १२ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.
नेहरा प्रदीर्घ काळ खेळेल असे वाटत नाही. तसे कधी वाटलेही नाही. म्हणून उद्याची चिंता न करता तो खेळाचा आनंद घेत आहे. टी-२० क्रिकेटसाठी हीच मनोवृत्ती आवश्यक असते. नेहराचे मूल्यमापन प्रत्येक लढतीवरून होते. तुम्ही काही या वयाचे रोपटे लावत नाही किंवा प्रतिभाही जोपासत नाही. नेहराला हे चांगले ठावूक आहे आणि त्यामुळेच तो इतरांच्या तुलनेत वेगळा भासतो.
शिखर धवनच्या पुनरागमनामुळे आनंद झाला. त्याने कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवले आहेत. फॉर्मात असताना माघार घेणे सोपे नसते. तो जर चांगला खेळत असेल तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचा खेळाडू आहे. रोहित शर्माबाबतची तेच म्हणावे लागेल. शिखरच्या पुनरागमनामुळे रहाणेला विश्रांती देण्यात आली. आगामी व्यस्त कार्यक्रम लक्षात घेता हा निर्णय योग्यच आहे. भारतीय संघ दावेदार म्हणून सुरुवात करणार असला तरी टी-२० क्रिकेटमध्ये ज्याचा दिवस असेल तो संघ वर्चस्व गाजवतो. त्यामुळे कुठलाही संघ बाजी मारू शकतो.
Web Title: Any team can bet, in the first match today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.