अबुधाबी : अखेरच्या चार षटकात टी-२० त काहीही शक्य असल्याचे मत मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड याने व्यक्त केले. पंजाबविरुद्ध सामन्याचा मानकरी ठरलेल्या पोलार्डने काल हार्दिक पांड्यासोबत २३ चेंडूत ६७ धावांचा पाऊस पाडला होता.
तो पुढे म्हणाला, ‘तुम्हाला परिस्थिीतीनुरूप खेळायचे असेल तर गोलंदाज कोण हे पाहून कुठल्या षटकात किती धावा अपेक्षित आहेत, याचा वेध घ्यावाच लागतो. हार्दिकने त्याचे काम चोखपणे बजावले. अखेरच्या चार षटकात काय करायचे आहे, याची आम्हाला जाणीव होती.’अखेरच्या षटकात पंजाबचा आॅफस्पिनर कृष्णप्पा गौतम याच्या हातात चेंडू पाहून मनोमन आनंद झाला. मी आणि पोलार्डने तब्बल २५ धावा वसूल केल्य. पोलार्डने नाबाद ४७ आणि हार्दिकने नाबाद ३० धावा केल्या. गौतम गोलंदाजीसाठी आला त्यावेळी रसगुल्ला खायला मिळणार असा भाव मनात आला. पोलार्ड आणि मी उत्तुंग फटकेबाजीच्या विचारात होतो. मी चुकलो, मात्र पोलार्डने उणीव भरून काढली. -हार्दिक पांड्यासुरुवातीच्या सामन्यांमध्ये लेग स्पिनर्सची चमकआतापर्यंतची आकडेवारी बघता आरसीबीचा भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहलने ३ सामन्यांत ५ बळी घेत फिरकीपटूंमध्ये आघाडी घेतली आहे. पंजाबचा लेग स्पिनर मुरुगन अश्विनने २ सामन्यांत ४ बळी आणि राजस्थानचा लेग स्पिनर राहुल तेवतियाने ३ सामन्यांत ४ बळी घेतले आहेत. सनरायजर्स हैदराबादचा अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानने ४ सामन्यांत ४ बळी घेतले आाहेत. राशिदने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४ षटकांत अचूक मारा करीत १४ धावांत ३ बळी घेतले होते. पंजाबचा लेग स्पिनर रवी बिश्नोई व मुंबई इंडियन्सचा लेग स्पिनर राहुल चाहरने प्रत्येकी तीन सामन्यांत प्रत्येकी चार बळी बळी घेतले आहेत.
चेन्नई सुपरकिंग्सचा लेग स्पिनर पीयूष चावलाने तीन सामन्यांत ४ आणि कोलकाता नाईट रायडर्सचा लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने दोन सामन्यांत ३ बळी घेतले आहेत. दिल्लीचा लेग स्पिनर अमित मिश्राने २ सामन्यांत २ बळी घेतले आहेत. तो या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसºया स्थानी आहे. दिल्लीतर्फे खेळणारा भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एका सामन्यात २ बळी घेतले, पण तो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्यानंतर खेळू शकला नाही.