भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) नुकतेच ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी खेळाडूंच्या सेंट्रल काँट्रॅक्टची यादी जाहीर केली. त्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. पण, फोर्ब इंडियानं जाहीर केलेल्या 100 श्रीमंत भारतीय सेलिब्रेटींमध्ये धोनी पाचव्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे बीसीसीआयनं करारातून बाहेर केले असले तरी धोनीचे 2019मधील उत्पन्न हे 2018पेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. धोनीनं 2018मध्ये 101.77 कोटी उत्पन्नाच्या तुलनेत 2019मध्ये 135.93 कोटी कमवले आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या धोनीची अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. त्यामुळेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आणि मागील वर्षी बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही धोनी अनेक ब्रांडचा सदिच्छादूत आहे.
सेव्हन : फेब्रुवारी 2016मध्ये लाँच करण्यात आलेल्या शूज कंपनीनं धोनीची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली. पण, धोनीनं त्यानंतर या ब्रांडचे मालकी हक्क विकत घेतले. स्पोर्टफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडः धोनी हा भारतातील तंदुरूस्त खेळाडू आहे आणि धोनीनं यातही गुंतवणुक केली आहे. धोनीच्या SportsFit World Pvt. Ltd. या नावाच्या जगभरात 200 व्यायामशाळा आहेत. चेन्नईयन एफसीः इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नईयन फुटबॉल क्लबमध्ये मालकी हक्क आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचेही गोवा एफसीत मालकी हक्क आहे. माही रेसिंग टीम इंडियाः धोनीचं बाईक्सवरील प्रेम हे जगजाहीर आहे. त्यामुळे या क्षेत्रात धोनी गुंतवणुक करणार नाही, असे होणार नाही. सुपरस्पोर्ट्स वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये धोनीनं माही रेसिंग टीम इंडियाची खरेदी केली आहे. हॉकी टीमः हॉकी इंडिया लीगमधील रांची रे संघातील मालकी हक्कही धोनीनं खरेदी केले आहेत. माही हॉटेलः हॉटेल माही रेसिडेंसी या नावाचं धोनीचं झारखंड येथे हॉटेल आहे. जाहिरातीः याशिवाय धोनी विविध जाहीरातींमध्येही झळकतो. पेप्सी, स्टार, गोडॅडी, बोस, स्नीकर्स, व्हिडीओकॉन, बूस्ट, ओरिएंट इलेक्ट्रीक, नेटमेड्स आदी ब्रांडच्या जाहीराती त्याच्याकडे आहेत.
IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम
...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान
बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान
श्रेयस अय्यर भविष्यातील मोठा फलंदाज
IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?